दिनांक :-२७-०८-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज,मुंबई:- काठमांडू येथे पूरपरिस्थितीतही श्री.पशुपतिनाथ दर्शन सुलभ; नेपाळमधील कुशवाहा व माळी समाजाकडून विशेष आदरातिथ्य.
नेपाळमधील पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ठीक ०८:०० वाजता काठमांडू येथील श्री.पशुपतिनाथ मंदिरात अत्यंत शांत, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध वातावरणात सहकुटुंब भाविकांचे दर्शन संपन्न झाले. कोणतीही घाईगडबड न होता आई-वडिलांसह भगवान श्री.पशुपतिनाथांचे अत्यंत उत्तम रीतीने दर्शन घडले.
नेपाळमधील या कठीण प्रसंगात माळी व कुशवाहा समाजाचे माजी मंत्री माननीय श्री.शत्रुघ्न सिंहजी, कुशवाहा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूरपरिस्थिती असूनही सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित असून चिंतेचे कोणतेही कारण नाही.
या वेळी कुशवाहा व माळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भाविकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करून भावपूर्ण आदरातिथ्य व पाहुणचार करण्यात आला. या संकटसमयी दाखवलेली आपुलकी आणि पुरवलेल्या सहकार्याबद्दल सर्व नेपाळ टीमचे आणि समाजबांधवांचे मनापासून आभार मानण्यात आले आहेत.

