दिनांक :- १९-०८-२०२६, गर्जा महाराष्ट्र न्युज,ठाणे:- ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील सर्वच्या सर्व पाचही उपायुक्त परिक्षेत्रात (१,२,३,४,५) परिमंडळ मध्ये बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. शहरातील कानाकोपऱ्यात उघडपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे दररोज कामगार,मजूर आणि गोरगरीब वर्ग भरडला जात असून अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत.
रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि परिमंडळ निहाय जाळे ठाणे शहरात ऑनलाईन लॉटरीचे हे अवैध जाळे चालवण्यासाठी तीन मुख्य ऑपरेटर सक्रिय असल्याचे समोर येत आहे:-
झोन १, झोन २ आणि झोन ५: या तिन्ही विभागांमध्ये ‘मोहम्मद’ नावाच्या व्यक्तीचे मोठे नेटवर्क कार्यरत असून त्याच्या माध्यमातून लॉटरीची अनेक बेकायदेशीर दुकाने थाटली गेली आहेत.
झोन ३ आणि झोन ४: या क्षेत्रांमध्ये ‘अमित ठक्कर’ व आहुजा(डिस्ट्रीब्यूटर) नावाच्या व्यक्तीची ऑनलाईन लॉटरी मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्या नेटवर्कने संपूर्ण परिसरात पाय पसरले आहेत.
मजूर वर्गाची लूट आणि कुटुंबांची नासधूस दिवसभर घाम गाळून कमावलेली तुटपुंजी मजुरी कामगार वर्ग या ऑनलाईन लॉटरीच्या आमिषाला बळी पडून गमावत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात रोज हजारो रुपये जुगारात उडवले जात आहेत. यामुळे मजूर आणि गोरगरीब वर्गाच्या घरात उपासमारीची वेळ आली असून कौटुंबिक शांतता पूर्णपणे कोलमडली आहे.
पोलीस हप्तेबाजी आणि गुप्त माहितीचा भांडाफोड :- या बेकायदेशीर धंद्याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे धक्कादायक वास्तव आता उघड होणार आहे. ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल’ आणि वरिष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक श्री. अनिल भाऊ महाजन यांची संपूर्ण टीम या ऑनलाईन लॉटरीच्या दुकानांचे पुराव्यानिशी व्हिडिओ रेकॉर्डिंगसह थेट स्टिंग ऑपरेशन करत आहे. या झोन निहाय अवैध धंद्यांतून हप्ते आणि ‘कलेक्शन’ घेणारे पोलीस विभागातील कर्मचारी नेमके कोणाशी आणि कसे कनेक्टेड आहेत, या संदर्भातील प्राथमिक माहिती ‘पार्ट १’ द्वारे समोर आणली जात आहे.
लवकरच येत आहे: ‘पार्ट २’ मध्ये लॉटरी घोटाळ्याचे सनसनाटी डिटेल्स!
‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’च्या या विशेष मोहिमे अंतर्गत ‘पार्ट २’ लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या दुसऱ्या भागात खालील बाबी पुराव्यांसह उघड केल्या जातील:
* कुठल्या झोनमध्ये ऑनलाईन लॉटरीला अधिकृत परमिशन आहे आणि कुठे बेकायदेशीर धंदे सुरू आहेत?
* कुठकुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत किती लॉटरीची दुकाने चालवली जात आहेत?
* हप्तेखोरीत पोलीस यंत्रणेतील कोणकोणते अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत याचे सविस्तर डिटेल्स.
गृहमंत्रालय आणि पोलीस आयुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार करणार!
ठाणे पोलीस आयुक्तालयाने तात्काळ ही बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी बंद करावी. ही दुकाने तात्काळ बंद न झाल्यास, मुख्य संपादक वरिष्ठ पत्रकार श्री.अनिल भाऊ महाजन हे स्वतः सर्व पुराव्यांचे डिटेल्स, लॅपटॉपमधील व्हिडिओ क्लिप्स आणि थेट पुरावे घेऊन: श्री. आशुतोष डुंबरे (पोलीस आयुक्त, ठाणे) , प्रधान सचिव (गृह विभाग, मंत्रालय), मा. गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ठाणे शहरातील पाचही झोनमध्ये सुरू असलेल्या या अवैध प्रकाराचा सविस्तर भांडाफोड केला जाईल आणि सर्व लाईव्ह व्हिडिओ जाहीरपणे प्रकाशित केले जातील.

