दिनांक :- २८/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज,भिवंडी :- भिवंडी विभागातील नवीन मुलचनाड कंपाउंड शेलार पालोर रोड काटई गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे परिसरातील बेकायदेशीर ‘धनलक्ष्मी डाईंग’ कारखान्या विरोधात आता ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल व ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशनची टीम ‘ च्या कार्यालयात पुराव्यानिशी लेखी तक्रार प्राप्त झाली आहे.

या अवैध डाईंग कारखान्यामुळे परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पुरावे समोर आल्यानंतर, ‘गर्जा महाराष्ट्र न्यूज’व ‘ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशन’ ने हे प्रकरण थेट वरिष्ठ पातळीवर लावून धरले आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) वरिष्ठ अधिकारी, मेंबर सेक्रेटरी तसेच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रासायनिक सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त; नियमांचे उल्लंघन

सदर धनलक्ष्मी डाईंग कारखान्यात व्यावसायिक व पर्यावरणीय नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कापड रंगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी, रासायनिक आणि दूषित सांडपाण्याचे कोणतेही योग्य नियोजन किंवा प्रक्रिया (Treatment) येथे केली जात नाही. हे केमिकलचे पाणी उघड्यावर आणि सांडपाणी वाहिनीमध्ये बेजबाबदारपणे सोडले जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रण आणि सुरक्षेच्या नियमांचे अनेक ‘कमतरता'(त्रुटी) उघडपणे दिसून येत आहेत.

मंत्रालय विधिमंडळाच्या वरिष्ठ पत्रकार व गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मुख्य संपादक तसेच ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल महाजन यांनी समस्येची तीव्रता लक्षात घेऊन थेट प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.आता या गंभीर आणि पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनंतर एम.पी.सी.बी बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, मेंबर सेक्रेटरी आणि पर्यावरण मंत्रालय या अवैध डाईंग कारखान्यावर काय ठोस कारवाई करतात, हे पाहणे उचित ठरेल.

गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाच्या वरिष्ठ टीमने तसेच ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाऊंडेशन भिवंडी शहरातील काही बेकायदेशीर डाईंगचा गोपनीय सर्वे केला आहे. त्या सर्वेनुसार अनेक डाईंग मध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत आहे.लवकरच या बेकायदेशीर असलेल्या इतर डाईंग पुराव्यानिशी पर्दापाश करणार असल्याचे गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक अनिल महाजन यांनी सांगितले.

Share.