दिनांक :- २०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, मुंबई प्रतिनिधी :- देशात आणि राज्यात वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर *‘ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन’या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असणारे प्रसिद्ध समाजसेवक श्री. अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वातून या फाउंडेशनची सुरुवात झाली असून, ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.*
राज्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्था (NGO) कार्यरत असल्या, तरी प्रत्यक्षात जमिनीवर उतरून प्रभावीपणे काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. हीच उणीव भरून काढत ‘ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन’ आता संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे.
हायकोर्टाच्या समितीसमोर मांडणार वास्तव
*राज्यातील प्रदूषण रोखण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) प्रत्येक ठिकाणी एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश जस्टिस अमजद अहतशाम सय्यद या उच्चस्तरीय प्रदूषण नियंत्रण समितीचे ते अध्यक्ष (Head) म्हणून काम पाहत आहेत. जस्टिस अनुजा प्रभूदेसाई या समितीमध्ये त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत.स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी अनेक ठिकाणी उत्तम काम करत आहेत.* तर काही ठिकाणी निष्काळजीपणा व चुकीचे काम होत असल्याचे समोर येत आहे. अधिकाऱ्यांच्या याच कामकाजाचे वास्तव थेट हायकोर्टाच्या कमिटीच्या लक्षात आणून देण्याचे महत्त्वाचे काम आता हे फाउंडेशन करणार आहे. जे अधिकारी प्रामाणिकपणे आणि चांगले काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
साईझिंग आणि डाईंग उद्योगांवर विशेष लक्ष
राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या साईझिंग आणि डाईंग (Sizing & Dyeing) उद्योगांबाबत बोलताना चेअरमन अनिल महाजन म्हणाले, “जे व्यावसायिक सर्व नियमांचे पालन करून पूर्णपणे प्रदूषणमुक्त व्यवसाय करत आहेत, त्यांना आमच्या फाउंडेशनतर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल. अशा प्रामाणिक व्यावसायिकांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, यासाठी संस्था सातत्याने पाठपुरावा करेल. मात्र, जे साईझिंग आणि डाईंग व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत आणि पर्यावरणाची हानी करत आहेत, त्यांच्यावर आमच्या एनजीओची (NGO) करडी नजर असेल. अशा दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी संस्था कायदेशीर पाठपुरावा करेल.”
महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प; नागरिकांना आवाहन
महाराष्ट्र संपूर्णपणे प्रदूषणमुक्त झालाच पाहिजे, यासाठी ग्रीन इंडिया पॉल्युशन कंट्रोल फाउंडेशन राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करणार आहे. हे कार्य केवळ काही लोकांपुरते मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावे, यासाठी फाउंडेशनने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील पर्यावरणप्रेमी नागरिक, महिला आणि तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या भागात किंवा क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या घटकांची, कारखान्यांची माहिती नागरिकांनी थेट फाउंडेशनकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ईमेल आयडी :- gi.pollutioncontrol@gmail.com
संपर्क क्रमांक :-* 8788964050

