दिनांक :- २०/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर,प्रतिनिधी :- आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. घर, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन हेल्थ कोच निलम गणेश पुजारी यांच्या माध्यमातून महिला आरोग्य जनजागृती मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांत त्यांनी सुमारे अडीच ते तीन हजार महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन करून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.या समुपदेशनाद्वारे संतुलित आहार, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला We R More कंपनीच्या पहिल्या डायमंड तसेच कोहिनूर टीमच्या प्रमुख राजनंदनी आंध्रे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच We R More कंपनीच्या उत्पादनांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी, याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्यविषयक प्रश्न विचारले. यावेळी ज्या महिलांनी ऑन-द-स्पॉट We R More कंपनीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्यांचा विशेष सन्मान करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी राजनंदनी आंध्रे यांनी “निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज” हा संदेश देत प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.भविष्यातही अधिकाधिक महिलांपर्यंत आरोग्य जनजागृती पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

