दिनांक :- १३/०७/२०२६ , गर्जा महाराष्ट्र न्युज, उल्हासनगर, प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या दि. १४ जुलै २०२६ रोजी झालेल्या उल्हासनगर दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचा आढावा, शासकीय योजनांचे परीक्षण तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली.
याच दिवशी उल्हासनगर महानगरपालिका व शासकीय रुग्णालयाच्या वतीने आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना Iron and Folic Acid Syrup IP (50 ml) या औषधाचे वितरण करण्यात आले.
मात्र वितरित करण्यात आलेल्या औषधाच्या बाटलीवरील तपशीलानुसार Batch No. : LAV25131AL, उत्पादन दिनांक (MFG) : जून २०२५ आणि मुदत समाप्ती (EXP) : ऑगस्ट २०२६ अशी नोंद आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी या औषधाची मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय माहितीनुसार Iron and Folic Acid Syrup हे औषध शरीरातील लोह व फॉलिक असिडची कमतरता भरून काढण्यासाठी वापरले जाते. हे औषध प्रामुख्याने गरोदर महिला, ॲनिमियाग्रस्त (रक्ताल्पता असलेले) रुग्ण, लहान मुले तसेच पोषकतत्त्वांची कमतरता असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जाते.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या औषधांचे वितरण लहान मुलांना का करण्यात आले? औषधे कायदेशीरदृष्ट्या मुदतीत असली तरी अशा प्रकारचे वितरण का करण्यात आले, याबाबत संबंधित आरोग्य विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.
वितरित औषधाचा तपशील :
• औषधाचे नाव : Iron and Folic Acid Syrup IP (50 ml)
• Batch No. : LAV25131AL
• Manufacturing Date : June 2025
• Expiry Date : August 2026
• Sr. No. : LAV86368

