दिनांक :- १७/०६/२०२६, गर्जा महाराष्ट्र न्यूज पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा शहर हे जळगाव जिल्ह्यातील एक मुख्य बाजारपेठ असलेले आणि वेगाने वाढणारे शहर आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबतच शहरात वाढणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या माऱ्या, मोबाईल चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या, ए.टी.म (ATM)फोडणे घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आता तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘जलद प्रतिसाद पथक’ (Quick Response Squad) काळाची गरज!
शहरातील गुन्हेगारांचा थरकाप उडवण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक *विशेष जलद प्रतिसाद पथक (QRS)* स्थापन करण्यात यावे. या पथकात केवळ तरुण, तत्पर आणि धावपळ करू शकणाऱ्या कार्यक्षम पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करावा.
गळ्यात रुमाल, डोळ्यांवर चष्मा आणि वाढलेली ‘ढेरी’ (पोट) पुढे काढून फिरणाऱ्या पोलिसांकडून गुन्हेगारांचा पाठलाग होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
अशा अकार्यक्षम आणि तब्येतीकडे दुर्लक्ष केलेल्या कर्मचाऱ्यांचा तात्काळ रिपोर्ट बनवून त्यांना ‘कंट्रोल जमा’ करण्यात यावे,अशी मागणी जोर धरत आहे.
‘वन बाटली, टू ग्लास’ संस्कृतीला चाप बसावा!
सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तम पगार देते, परंतु त्या बदल्यात जनतेला अपेक्षित सेवा मिळते का? हा मोठा प्रश्न आहे. दररोज संध्याकाळी अनेक पोलीस कर्मचारी कोपऱ्यात किंवा बिअर बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत पाहायला मिळतात, अशी चर्चा आहे. अशा खाऊन-पिऊन मस्तवाल झालेल्या आणि आरोग्याची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची *आरोग्य तपासणी करून एक शॉर्टलिस्ट (यादी)तयार करण्यात यावी आणि हा अहवाल वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SP) साहेबांकडे पाठवण्यात यावा.
वर्दीची लाज वाटते का? शिस्तीचा अभाव!
पाचोरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी (PI,API, PSI) आपले कर्तव्य चोख बजावत आहेत,यात शंका नाही. मात्र,खालच्या दर्जाचे कर्मचारी कमालीचे आळशी झाले आहेत.
डीबी स्कॉड (DB Squad) वगळता इतर अनेक कर्मचाऱ्यांना वर्दी घालण्याची लाज वाटते की काय,असा प्रश्न पडतो.
गळ्यात रुमाल टाकून साध्या कपड्यांवर गावात हिंडणाऱ्या पोलिसांमुळे गुन्हेगारांमधील पोलिसांची भीती पूर्णपणे नष्ट झाली आहे.समाजात वावरताना कायद्याचा धाक असणे अनिवार्य आहे.
गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे तरच पाचोरा सुरक्षित राहील!

