दिनांक – २५/०५/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरात लूम कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सदरचा कामगार हा मोठ्या प्रमाणात ताडी पिणारा आहे. भिवंडी शहरात सध्या ताडीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे.शहरात जे अधिकृत ताडीचे दुकान आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी डुप्लिकेट ताडीचा सर्रास वापर होत आहे. त्यामध्ये नशेची पावडर व नशेच्या गोळ्या टाकून मोठ्या प्रमाणात ताडी विक्री होत आहे. त्यामुळे अनेक कामगारचे आयुष्य उध्वस्त होत आहे. भिवंडी शहरातील ताडी दुकानांमध्ये उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीच्या टीमने छापा टाकून ताडीच्या भरलेल्या ड्रम मधून ताडी तपासणीसाठी तात्काळ लॅबमध्ये पाठवावी.

मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या कार्यालयात भिवंडी शहरातील ताडी केंद्राच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलने याबाबतची बातमी प्रकाशित केली आहे. तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) कडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे. भिवंडी शहरात बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात ताडी मध्ये नशेची पावडर व नशेच्या गोळ्या टाकून ताडी-विक्री केली जात आहे. याबाबत लवकरच डॉ.राजेश देशमुख आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क यांची भेट घेणार आहे. भिवंडी शहरातील स्थानिक दारूबंदी प्रशासन काय करत आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सदरचा बेकायदेशीर प्रकार बंद न झाल्यास किंवा ताडी मध्ये नशेची पावडर व नशेच्या गोळ्या टाकून ताडी विक्री न थांबल्यास गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलची गोपनीय टीम पाठवून संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ मंत्रालयात व उत्पादन शुल्क अधिकारी (एक्साईज) यांच्याकडे पाठवण्यात येईल.

