दिनांक – १६/०५/२०२६ भिवंडी /ठाणे,गर्जा महाराष्ट्र न्यूज:-
भिवंडी ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन,पडगा पोलीस स्टेशन, गणेशपुरी पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत मुंबई-नाशिक हायवे वरती अनेक ढाबे हॉटेल्स आहेत.रात्रीचा या रस्त्याला एक मोठा जलसा दिसतो.यापैकी 75 टक्के ढाब्यांवरती हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.भिवंडी शहरातील सर्व लहान-मोठे अनेक लोक तरुण मुले,नाबालिक मुले या ठिकाणी हुक्का पिण्यासाठी जात आहे.यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ टोबॅको,डबल एप्पल,दुबई स्पेशल,एप्पल मिंट,मलई सालसा अशा विविध प्रकारचे नशेडी फ्लेवर या मध्ये वापरले जात आहे.ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री.मित्तल साहेब यांच्या सूचनेचे सुद्धा या ठिकाणी पालन होताना दिसत नाहीये.

भिवंडी तालुका,पडगा,गणेशपुरी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रंदिवस अनेक ढाबे सुरू असतात.यांना कायद्याची भीती नाही का? सर्व नियमबाह्य काम या ढाब्यांवरती सुरू आहे. बालकामगार ही आहेत तसेच शरीराला हानिकारक केमिकलं युक्त कलर जेवणात वापरला जातो.

कधी कुठल्या धाब्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतात.तर कुठल्या ढाब्यावर मारामारी अनेक प्रकरण पुढे येते आहे.यावर कोणाचे नियंत्रण नाही.स्थानिक पोलीस पेट्रोलिंग करताना दिसत नाही.यातील बरेच ढाबे अनधिकृत आहेत फॉरेस्टच्या जागेमध्ये बांधले आहेत.

भिवंडी तालुका पोलीस स्टेशन,पडगा पोलीस स्टेशन , गणेशपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही ढाब्यांवरती सूरु असलेल्या बेकायदेशीर हुक्का ताबडतोब बंद करण्यात यावा व तसेच शासनाने घालून दिलेल्या नियम अटी नुसार ढाबा सुरू ठेवण्यात यावा.अशी सूचना ढाबा चालकांना देण्यात यावी जो ढाबा वाला नियमबाह्य काम करेल त्यावर कडक कारवाई करावी.

भिवंडी तालुका पोलीस स्टेशन पडगा, गणेशपुरी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व ढाब्यावर ताबडतोब बेकायदेशीर सुरू असलेला हुक्का बंद न झाल्यास तसेच धाब्यावर इतर बेकायदेशीर नियमबाह्य काम सूरू राहिल्यास पुराव्यानिशी ढाबा व चालक मालक यांच्या नावासह गृह मंत्रालय,पोलीस महासंचालक मुबंई,ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,कार्यालयात संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात येईल.असे मंत्रालयातील वरिष्ठ पत्रकार तसेच गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अनिलभाऊ महाजन यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला सूचना केलेली आहे.तरी सर्व स्थानिक सर्व प्रशासन फूड अधिकारी,पोलीस अधिकारी,फॉरेस्ट अधिकारी फायर ब्रिगेड,अधिकारी सर्वांनी तात्काळ लक्ष घालावे.

Share.