दिनांक – २८/०४/२०२६ पाचोरा / जळगाव ,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- पाचोरा शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन आणि कर्जबाजारी.कुटुंबावर आर्थिक संकटाचे सावट.
पाचोरा तालुक्यात अवैध सावकारी बोकाळली आहे. अवैध सावकारी करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी.
पाचोरा तालुक्यातील काही मास्तर, शिक्षक ,प्राध्यापक,डॉक्टर, सरकारी नोकरदार, अधिकारी, राजकारणी, अवैधरित्या धंदा करणारे लोक या सर्व क्षेत्रातील अनेक लोकांचे पैसे काही ठराविक लोकांच्या माध्यमातून अवैधरित्या मार्केट मध्ये अवैध सावकारीच्या रूपाने फिरत आहे.
याला सर्व सामान्य तरुण वर्ग बळी पडत आहेत याला लगाम लागला पाहिजे.
सध्या पाचोरा शहरात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. कर्ज बाजरी होत आहे. 10% 20% 30% दराने व्याजाने पैसे वापरत आहेत.
कोणी जुगार खेळत आहे तर कोणी बियरबार मध्ये मजा मारत आहे.सर्वसामान्य कुटुंबातील हे तरुण आज व्यसनाधीन झालेले दिसत आहेत.
पाचोरा शहरात अवैध सावकारीचा वाढता कहर; प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज.
पाचोरा शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. यावर लगाम लावण्याची आज प्रशासनाला खरी गरज आहे. तालुक्यातील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी यामध्ये तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अवैध सावकारी करणाऱ्या लोकांना तात्काळ कडक शासन झाले पाहिजे. कुठले सावकारी लायसन्स नसताना व्याजाने पैसे देणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात व तालुक्यात वाढत आहे. यामध्ये अनेक नोकरदार वर्ग सुद्धा व्याजाने पैसे वाटत आहे. अनेकांना पैसे कमवण्याची घाई झाली आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या टक्का मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात वाढत आहे. पाचोरा तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुण आहेत. यांचे लग्नही झालेले नाहीत. यांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही. उठ-सुट व्याजाने पैसे घ्यायचे आणि बियर बार मध्ये एन्जॉय करायचा,पत्त्याच्या क्लब मध्ये जायचे जुगार खेळायचा,अवैध धंदे करायचे, रात्री बे रात्री रेती चोरायची, अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाला पाचोरा शहरातील तरुण लागले आहेत. शहरातील पोलीस प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांनी तालुक्याचा विचार करावा सामाजिक बांधिलकी जपावी आणि अवैद्य सावकारीला लगाम लावावे.

अवैध सावकारी करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत तसेच मनीलॉंड्रीगं कायद्या खाली कारवाई करून त्यांना तडीपार करावे.
गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या टीमच्या वतीने पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जर आपल्याला कोणी व्याजाने पैसे वाटत असेल किंवा जास्त व्याज मागत असेल बेकायदेशीर वसुलीसाठी तगादा लावत असेल तर आपण गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा.नक्कीच आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच कोणी जर व्याजाने पैसे घेतले असतील मुद्दल पेक्षाही जास्त व्याज भरून झाले असेल तरीही समोरचा अवैध सावकारी करणारा व्यक्ती पैसे मागत असेल तगादा लावत असेल दादागिरी करत असेल तर आपण गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाकडे संपर्क साधू शकता किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करू शकता आपला आवाज नक्कीच योग्य त्या ठिकाणी पोहोचला जाईल.तसेच अवैध सावकारी करणाऱ्यांवर कडक कारवाई साठी पाठपुरावा केला जाईल पाचोरा शहरातील अवैध सावकारी करणाऱ्यांची आता खैर नाही हरामाचा पैसा डबल करणारे व्याजाने पैसे वाटणारे लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.सर्व समान्य जनतेचा आवाज गर्जा महाराष्ट्र न्यूज समूह.
श्री.अनिल महाजन.
मुख्य संपादक,गर्जा महाराष्ट्र न्युज समूह,मुंबई

