दिनांक – २७/०४/२०२६ भिवंडी /ठाणे ,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कुंभारवाडा पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली असून, या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. परिसरात विविध तंबाखूजन्य फ्लेवर्सचे हुक्का खुलेआम चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी नाबालिग मुलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असून ते हुक्का सेवन करत असल्यामुळे व्यसनाधीनतेचा धोका वाढत आहे.

स्थानिक प्रशासन आणि कुंभारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित हुक्का पार्लरवर तात्काळ छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे चेअरमन व मुख्य संपादक अनिल महाजन यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवले आहे. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारवाडा पोलीस ठाणे हद्दीत खालील ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले आहे:

•(०१) आसबीबी रोड, गुप्ता कंपाऊंड येथे सलीम मलवारी यांचा हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
•(०२) खदान रोड, फुलेनगर, खोका कंपाऊंड, ओबेरा हॉटेलसमोरील गल्लीमध्ये जोयल नामक व्यक्तीचा हुक्का पार्लर सुरू आहे.
•(०३) पद्मानगर, साईबाबा मंदिर परिसरात रितेश नामक व्यक्तीचा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती आहे.

सदर सर्व हुक्का पार्लर कुंभारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकां कडूनही करण्यात येत आहे.

Share.