ओम साई होम सोसायटी,पद्मशा सोसायटी,आयोध्या सोसायटी या भागातील सर्व रहिवाशांना ओपन जिम व गार्डनच्या सुविधेचा लाभ मिळणार…
दिनांक – १६/१२/२०२५, भिवंडी प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आपल्या स्वभावाने सर्वांना आपलेसे बनवणारे अनेक वेळा भिवंडी मनपा प्र.क्र.१३. मधून नगरसेवक राहिलेले, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे श्री.बाळाराम मधुकर चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती न.ग.रा.त्थान अभियान जिल्हास्तरीय योजने अंतर्गत भिवंडी महानगर पालिकेकडून उद्यानाचे काम पूर्ण श्री.बाळाराम चौधरी यांनी करून घेतले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या उद्यानाचा लाभ मिळायला सुरुवात झाली. स्थानिक बालगोपाल यांना गार्डनमध्ये खेळण्यासाठी सुविधा मिळाली, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी (वॉकिंग) करण्यासाठी उद्यानाचा लाभ मिळत आहे.
हा उद्यान उद्घाटन सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.स्थानिक शेकडो रहिवाशांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या उद्घाटन सोहळ्याची माहिती व चर्चा थेट मंत्रालय स्तरावर व शिवसेनेच्या शिंदे गटांच्या सर्व वरिष्ठ पातळीवर याची नोंद झाली तसेच भिवंडी मनपातील सर्व अधिकाऱ्यापर्यंत उद्घाटन सोहळ्याची माहिती पसरली. या उद्घाटन सोहळ्याला श्री.बाळाराम मधुकर चौधरी, माजी नगरसेवक भिवंडी म.न.पा तसेच त्यांचे चिरंजीव युवा नेतृत्व श्री.रोहित चौधरी व राज्याचे ओबीसी बहुजन नेते, तसेच मंत्रालय-विधिमंडळातील वरिष्ठ पत्रकार व ग्रीन इंडिया पोलुशन कंट्रोल फाऊंडेशनचे चेअरमन श्री.अनिलभाऊ महाजन या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन स्थानीक कार्यकर्ते व रहिवाशांनी केले होते. यावेळी ओम साई होम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे “ए विंग” चे चेअरमन श्री.विजय म्हात्रे, सेक्रेटरी श्री.अश्विन देशमुख , “बी विंग” चे चेअरमन श्री.अमर मोरे, सेक्रेटरी श्री.रोहित तांबे, “सी विंग” चे चेअरमन श्री.धर्मेंद्र शेलार, श्री.सेक्रेटरी जितेंद्र पाटील, “डी विंग” चे चेअरमन श्री.रमेश मिश्रा सेक्रेटरी श्री.चेतन चिंकाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती लाभली. टेमघर प्रभाग १३. मध्ये श्री.बाळाराम चौधरी व श्री.रोहित चौधरी यांना या भागात जनतेचा खूप मोठा पाठिंबा जनतेचा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाकडून किंवा भिवंडी मनपाकडून निधी मिळो अथवा न मिळो स्वतःच्या स्वखर्चाने काम करणारे व स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडणारे श्री.बाळाराम चौधरी व श्री.रोहित चौधरी हे आहेत मोठे कार्य करताना दिसून येत आहे. या चौधरी परिवाराबद्दल स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये खूप मोठे आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

