दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपले डोके टॉवेलने बांधले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देशमुख यांनी दिवसभर परिसरात प्रचार केला. त्यांची नरखेडमध्ये सायंकाळी बैठक झाली. बैठक आटोपल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह कारने काटोलकडे रवाना झाले. दरम्यान, बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
Breaking
- पाचोरा पालिकेत चाललंय तरी काय? आमदार-नगराध्यक्षांच्या कोट्यवधींच्या निधीवर ठराविक ठेकेदार व अधिकाऱ्यांचा डल्ला.
- पाचोरा तालुक्यात वीटभट्टी चालकांचा बेकायदेशीर आणि अनाधिकृत कारभार. महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कडक कारवाई करावी!
- विटा नगरपरिषदेचा देशात डंका! स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान
- भिवंडी में 20 नवंबर, 2026 को होने वाले MPCB के विवादित सर्वे पर विवाद; “ग्रीन इंडिया पॉल्यूशन कंट्रोल फाउंडेशन” ने बिना इजाज़त के सर्वे करने वाले अधिकारियों की सीनियर लेवल की जांच की मांग की – अनिल महाजन।
- भिवंडीत एम.पी.सी.बीच्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या वादग्रस्त सर्व्हेवरून रणकंदण; “ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाऊंडेशन “ आक्रमक अनधिकृत सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी – अनिल महाजन.
- पाचोरा शहराला अनधिकृत बॅनरचा विळखा! सत्ताधारी पक्ष असो व विरोधी पक्ष , शिवाजी चौकातील बॅनरवर तत्काळ कारवाई करा; गर्जा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अनिल महाजन यांचा कडक इशारा.
- भिवंडी बायपासला बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग आणि अनधिकृत डान्स बारचा विळखा; वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक अनिलभाऊ महाजन यांचा पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कारवाईचा इशारा.
- साक्री-धुळे महामार्गावरील ढाब्यांवर अवैध केमिकल व गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा; प्रशासनाविरोधात संताप, तात्काळ कारवाईची मागणी

