दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, 500 मुलांची व 500 मुलींची वसतिगृह इमारत तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले.

भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

Share.