दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण १७६ पैकी ३७ प्रकरणे निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.
लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश, पी. के. खराटे आणि ए. जे. फटाले, वकील प्रतिक्षा विचारे, मदनेश व्ही. सिंग यांनी काम पाहिले. या लोकअदालतचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल जी. राणे आणि श्रीमती आर. के. कुळकर्णी तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.