दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सर्वत्र नवरात्र महोत्सव सुरू झाला असून पाचोरा शहरात विविध मंडळांच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आज दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले लखन वाधवाणी नामक युवकाचा एका कार्यक्रमात गरबा खेळत असतांना अचानक चक्कर आल्याने सदर युवक जमिनीवर खाली अचानक पडल्याने तात्काळ काही सहकाऱ्यांच्या मदतीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु सदर इसमाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिंधी कॉलनी येथील अतिशय गरीब कुटुंबातील रमेश वादवाणी यांचा हा मुलगा होता सदर लखन याचे वय २७ होते तो चाळीसगाव येथे पेट्रोल पंपावर खाजगी नोकरी करत असल्याची माहिती देखील मिळाली आहे व त्याचे वडील बूट चप्पलच्या दुकानात कामगार म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या परिवारातील एकुलता एक मुलगा असलेला अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून पुढे आलेला हा युवक मागील वर्षी एका मंडळामध्ये दांडिया किंग देखील ठरला होता परंतु नशिबाने त्याच्यासोबत जणू त्याच्यासोबत थट्टा केली असावी असे चित्र याठिकाणी निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती मिळताच रुग्णालयामध्ये आमदार पुत्र सुमित पाटील त्याचबरोबर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलदादा शिंदे तसेच काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन दादा सोमवंशी तसेच सिंधी कॉलनी परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
Breaking
- पाचोरा पोलिसांची ‘मरगळ’ झटकण्याची वेळ; ‘ढेरी’ पुढे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कंट्रोलला जमा करा!
- ओबीसी जनक्रांती परिषदेची नवीन राज्य कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार.
- भिवंडी मनपा हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट मनपा आयुक्त श्री.अनमोल सागर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण ?
- भिवंडी शहरात डुप्लिकेट ताडीची विक्री मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पादन शुल्क (एक्साईज) अधिकारी कुंभकरणाच्या झोपेत .
- जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, भडगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कुंभ करणाच्या झोपेत.
- नाशिक हायवेला तसेच वाडा रोड येथे सरू असणाऱ्या ढाब्यांवरती अनेक ठिकाणी बेकायदेशीर हुक्का सुरू.दम मारो दम सर्व ढाबाच्या चौकशीची मागणी.
- भिवंडी ट्राफिक पोलिसांचा विषय पुन्हा चर्चेला, अनेक नियमबाह्य काम भिवंडी ट्राफिक विभागात सुरू.
- पाचोरा शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन आणि कर्जबाजारी. कुटुंबावर आर्थिक संकटाचे सावट.

