दिनांक :-१०-०९-२०२६,गर्जा महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी लखनऊ:- ओबीसी, मागासवर्गीय व अति-पिछडा समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी नेते श्री.अनिल महाजन यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री. केशव प्रसाद मौर्य यांची सदिच्छा भेट घेतली. या दौऱ्यात महाजन यांनी माळी, मौर्य, कुशवाह, सैनी आणि शाक्य समाजबांधवांच्याही भेटीगाठी घेतल्या.

ही भेट पूर्णपणे बिगर राजकीय व सामाजिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले. या वेळी ओबीसी आरक्षण, कार्यकर्त्यांवर होणारे अन्याय आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

विशेषतः केंद्र सरकारने आगामी जनगणने मध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी शिफारस उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली जावी, अशी मागणी अनिल महाजन यांनी या प्रसंगी केली. त्यांच्या या सामाजिक पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share.