दिनांक –०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ओबीसी – बहुजन समाजाचे नेते ,अनिल महाजन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक सचिव यांनी आपल्या पक्षाकडे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल- पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याबाबत नॉमिनेशन अर्ज दिनांक ३/९/२०२४ रोजी दाखल केला आहे. ओबीसी – बहुजन समाजाचा आमदार एरंडोल-पारोळा विधानसभेत व्हावा ही सामान्य जनतेची इच्छा आहे. ओबीसी – बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अनिल महाजन यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्षाकडे) एरंडोल- पारोळा विधानसभा येथील उमेदवारी मागितली आहे. लवकरच या बाबत इच्छुकांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात होणार आहेत. त्यासाठी यांनी सर्व आपली वैयक्तिक आणि सामाजिक माहिती भरून पक्षाकडे दिनांक ०३/०९/२०२४  रोजी आपला अर्ज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दाखल केलेला आहे. लवकरच पक्षाकडून महाराष्ट्रातील व जळगाव जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या मतदारसंघ निहाय उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

अनिल महाजन यांना यावेळी पत्रकार ने विचारले असता अनिल महाजन यांनी सांगितले की एरंडोल-पारोळा मतदार संघ हा विकासापासून दुर्लक्षित आहे. या मतदारसंघाला  विकासाचे व्हिजन असणाऱ्या आमदाराची गरज आहे हा मतदारसंघ गावात आहे.खेड्यात काहीच कळत नाही यातील जनतेला तालुक्याच्या विकासाची एक ब्ल्यू प्रिंट तयार करून नव्याने मतदारसंघाचा विकास करणे गरजेचे आहे व आलटून-पालटून तेच तेच एका विशिष्ट समाजाचे नेते निवडून त्या ठिकाणी येत आहेत. फक्त  स्वतःचा विकास करणारे नेत्यांना आता एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील जनता हद्दपार करणार आहे. पुढे बोलताना अनिल महाजन यांनी सांगितले की माजी मंत्री आणि बहुजन नेते एकनाथराव खडसे यांनी जर ठरवलं तर मी एरंडोल- पारोळा विधानसभेत शंभर टक्के आमदार म्हणून निवडून येईल यात काही शंका नाही. नाथाभाऊ कुठल्याही पक्षात असतील तर पक्ष विहिरीत नाथाभाऊ यांना मानणारी ही अनेक लोक जळगाव जिल्ह्यात खासकरून एरंडोल – पारोळा मतदार संघात आहे. पण पुढे यावेळी अनिल महाजन बोलताना सांगितले की शेवटी पक्ष जो निर्णय घेईल पक्षाने संधी दिली तर नक्कीच संधीचे सोनं करेल आणि एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचा विकास करेल.

पत्रकारांनी विचारल्यावर  बोलताना अनिल महाजन यांनी सांगितले की पक्षाने मला उमेदवारी का द्यावी एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी-बहुजनांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात नेहमीच ओबीसी बहुजन समाजावर अन्याय होत आला आहे. काही प्रस्थापित लोकांकडून अनेकांच्या शेती, जमिनी हडपल्या गेल्या आहेत. यांचा वाली कोणी नाही तसेच शिक्षण, आरोग्य ,शेती, रोजगार, शेतकरी यांच्याकडे अद्याप पर्यंत कोणत्याही पुढाऱ्याने लक्ष दिले नाहीये. फक्त दर वेळेस* जाती-पातीचे राजकारण करून ओबीसी – बहुजन समाजाला दाबून ओबीसी – बहुजन लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकून आपली पोळी भाजण्याचे काम काही लोक करत आहे. त्यामुळे या जातीपातीचे राजकारणाला कायमचा आळा घालायचा आहे. यासाठी आपल्याला थेट मुंबईहून ग्रामीण भागामध्ये स्थानिक जनतेच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर एरंडोल-पारोळा नगरीचा विकास करण्यासाठी यायचे आहे

Share.