Author: Team GarjaMaharashtra

नवी दिल्ली प्रतिनिधी : प्रस्तावित सुधारणांनुसार वक्फ बोर्डाने केलेल्या सर्व मालमत्तेच्या दाव्यांसाठी अनिवार्य पडताळणी आवश्यक असेल. वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त मालमत्तांसाठी हीच पडताळणी प्रक्रिया प्रस्तावित आहे. वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं. सरकारने यापूर्वी कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्यासाठी राज्य वक्फ बोर्डांचे व्यापक अधिकार आणि बहुतेक राज्यांमध्ये अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात होणारा विलंब लक्षात घेतला होता. तसंच गैरवापर टाळण्यासाठी वक्फ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न आहे. वक्फ म्हणजे काय तर, अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती  होय. एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला…

Read More

सातारा प्रतिनिधी : सज्जनगड ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात ‘सेल्फी’ काढताना खोल दरीत पडलेल्या युवतीला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि ‘छत्रपती शिवेद्रसिंहराजे रेस्कु टीम’ला यश आले. या अपघातात युवती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवतीचे नाव समजू शकले नाही. सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढताना दरीत कोसळली.  सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे . ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त…

Read More