BIGGBOSSMARATHI : बिग बॉस मराठीचा ५वा सिझन सुरु आहे. हा सिझन सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे. असं असताना या कार्यक्रमात रडारड, भांडणं, टोमणे, आरोपप्रत्यारोप असं सगळं घडताना दिसत आहे. यावरूनच प्रेक्षकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. कोणत्या स्पर्धकाला आपला सपोर्ट असणार? याबाबत सोशल मीडियावर पोस्ट पाहायला मिळत आहेत. अभिनेते आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमधील स्पर्धक किरण माने यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन: श्याम दराडे या तिघांना किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे. तशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.
किरण माने म्हणंतात, ‘‘हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांना रहाणार… तिघं गांवच्या मातीतली आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी ‘सो काॅल्ड’ सभ्य-असभ्यता, संस्कृती-फिंस्कृती, शुद्ध-अशुद्धता उंच कोलून, रिअल वागून लोकप्रिय होऊन इथवर पोहोचलेली आहेत. इथेही ते जे काहीही कसेही वागतील ते ‘रिअल’ असणार.’’ या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. डीपी आणि छोटा पुढारी माझ्यावर खुप प्रेम करतात. वरचेवर मेसेज सुरू असतात. तिघंबी लै भारीयेत.. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. आपली इच्छा नाही, ध्येय नाही, लायकीही नाही.. आणि ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करतोय तोही त्यांच्या सोडाच, मनोरंजन इंडस्ट्रीत नव्याजुन्या कुणाच्याच तोंडचा घास नाही, दम नाही. फरक समजून घ्यायचा असतो. कोणाला गंमतजंमत करणारी रील्स करून फाॅलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करुन फाॅलोअर्स मिळवतात.
खोटं वागणार्या आणि माकडचाळे करणार्यांचं बिगबाॅसमध्ये माकड होतं. हे चार वर्षांपुर्वी माझं मत होतं. पुर्वी मी बिगबाॅसच्या सिझन दोनची ऑफर नाकारली होती, हा त्याचा सणसणीत पुरावा ! बाकी तिथं धुणीभांडी करण्याला मी कधी कमीपणाचं मानलं नाही. ‘बायकांची कामे’ मानून अशा कामांना हिणवणारे बुळगे नामर्द असतात. असो. सिझन चार स्विकारला कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मी मोदीवर टीका करणारी पोस्ट केली. भक्तडुक्कर पिलावळीने प्रचंड उच्छाद मांडला आणि मला सिरीयलमधुन काढुन टाकले. आज मी जिद्दीनं पायर्या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटींनी वाढवलं. ही आत्मप्रौढी फक्त डुक्करपिलावळीसाठी आहे. माझ्या चाहत्यांसमोर मी नम्रच आहे. याचबरोबर बिगबाॅस माझ्यासाठी गाॅडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही, झालं तर आपल्या गुणांनी तो स्पर्धक माकड ठरतो. बिगबाॅस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकड.