VINESH PHOGAT । करोडों भारतीयांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. याचा स्पष्ट अर्थ विनेश फोगट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही. संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि ती आज रात्री उशिरा तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती, पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरवण्यात आले ते जाणून घेऊया… विनेश फोगट हिला ५० किलो वजनी गटात अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन १००…
Author: Team GarjaMaharashtra
जालना प्रतिनिधी : आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. तिथे लोकांच्या वेदना आणि आक्रोश आहे. मात्र, महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण महाराष्ट्र हा आमचा आहे. केवळ नेत्यांचा नाही. हा सगळ्या जातीधर्मांच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. इथे शांतता आहे. काही लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाज त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. सरकारने बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा, असं विधान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्र हा सर्व जातीधर्मांच्या लोकांचा असून बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या राज्यात कधीही निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले. ज्यांना गरिबीच्या झळा बसल्या आहेत, ज्यांचा मुलाला एका टक्क्याने…
BSNL 5G : सरकारी कंपनी बीएसएनएल आपल्या किमतींमध्ये फार बदल न करता खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना सध्या दिसत आहे. नुकताच बीएसएनएल 5G वरुन पहिला कॉल यशस्वीपणे करण्यात आला असून त्यामुळे बीएसएनएल 5G लाँचिंगच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट आहे. जिओ, एअरटेल, व्हीआय या कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली असून याचा फायदा बीएसएनएल झाल्याचे दिसून आले आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या दरात वाढ केल्यानंतर बीएसएनएलने आपल्या दरात कोणतीच वाढ केली नाही त्यामुळे याचा फायदा बीएसएनएलला झाल्याचे दिसून आले. अनेकांनी आपला नंबर बीएसएसएलवर पोर्ट केल्याचे दिसून आले. बीएसएनएलकडून 5G लाँचच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच बीएसएनएल ही 5G मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्याशी स्पर्धा करेल…
BIGGBOSSMARATHI : बिग बॉस मराठीचा ५वा सिझन सुरु आहे. हा सिझन सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे. असं असताना या कार्यक्रमात रडारड, भांडणं, टोमणे, आरोपप्रत्यारोप असं सगळं घडताना दिसत आहे. यावरूनच प्रेक्षकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. कोणत्या स्पर्धकाला आपला सपोर्ट असणार? याबाबत सोशल मीडियावर पोस्ट पाहायला मिळत आहेत. अभिनेते आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमधील स्पर्धक किरण माने यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन: श्याम दराडे या तिघांना किरण माने यांनी पाठिंबा दिला आहे. तशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. किरण माने म्हणंतात, ‘‘हे कसेही खेळले, समजा मुर्खपणा केला, तरी…
Rohit Sharma Record : भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून २४० धावा केल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या सामन्यात शुबमन गिलने कर्णधार रोहित शर्मासह भारताच्या डावाची सलामी दिली. या सामन्यात रोहित शर्माने २ धावा करताच राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडीत काढला. रोहित शर्मा आता वनडे फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे राहुल द्रविड आधी होता. राहुल द्रविडने त्याच्या वनडे कारकिर्दीत १०,७६८ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने या…
आरोग्य : उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. कारण- उच्च रक्तदाब हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, सकाळचा तुमचा रक्तदाब कसा आहे यावरून तुम्ही तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्याविषयी जाणून घेऊ शकता. “सकाळच्या रक्तदाबामुळे आपल्याला काही गंभीर संकेत मिळतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका” असे तज्ज्ञ म्हणतात. तसेच, तज्ज्ञ सांगतात, “दिवसभर आपल्याला रक्तदाबात चढ-उतार दिसून येतो. विशेषत: सकाळी रक्तदाब वाढतो. सकाळी उच्च रक्तदाब दिसून येणे, हे चिंतेचे कारण असू शकते. “रक्तदाब हा ताण हार्मोन, झोपेचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे वाढू शकतो. रक्तदाब कधीतरी वाढणे हे सामान्य असले तरी सतत उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल, तर…
नवी दिल्ली प्रतिनिधी : प्रस्तावित सुधारणांनुसार वक्फ बोर्डाने केलेल्या सर्व मालमत्तेच्या दाव्यांसाठी अनिवार्य पडताळणी आवश्यक असेल. वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त मालमत्तांसाठी हीच पडताळणी प्रक्रिया प्रस्तावित आहे. वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं. सरकारने यापूर्वी कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्यासाठी राज्य वक्फ बोर्डांचे व्यापक अधिकार आणि बहुतेक राज्यांमध्ये अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात होणारा विलंब लक्षात घेतला होता. तसंच गैरवापर टाळण्यासाठी वक्फ मालमत्तेचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न आहे. वक्फ म्हणजे काय तर, अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती होय. एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला…
सातारा प्रतिनिधी : सज्जनगड ठोसेघर मार्गावर बोरणे घाटात ‘सेल्फी’ काढताना खोल दरीत पडलेल्या युवतीला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि ‘छत्रपती शिवेद्रसिंहराजे रेस्कु टीम’ला यश आले. या अपघातात युवती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवतीचे नाव समजू शकले नाही. सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढताना दरीत कोसळली. सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे . ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त…