Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –०३/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादानंतर एका मराठी तरुणाला कान पकडून माफी मागावी लागली. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंब्रा येथील बाजारात गुरुवारी एका तरुणाने भाजी विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वादाला सुरुवात झाली. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मराठी भाषेच्या वापरावरून झालेल्या वादानंतर एका मराठी तरुणाला कान पकडून माफी मागावी लागल्याची एक वादग्रस्त घटना नुकतीच समोर आली आहे. गुरुवारी तरुणाने एका भाजी विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वाद सुरू झाला.                                         …

Read More

दिनांक –०२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  हरिनामाचा जप करीत असताना पांडुरंग उलपे यांना १५ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलवले. अनेक प्रयत्नांनंतर रात्री अखेर डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि ॲम्ब्युलन्स मधून त्यांना घरी नेताना रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर नव्या दमाने ते पुन्हा सोमवारी घरी परतल्याने देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हा कुठल्या सिनेमातील प्रसंग नाही, तर प्रत्यक्ष उलपे मळा परिसरात घडलेली ही घटना आहे. पांडुरंग रामा…

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  भीकेला लागलेला पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात दहशतवादी कट रचत राहतो. भारतीय सैन्यदेखील प्रत्येकवेळी पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडते. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.

Read More

दिनांक –३०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  झू चेंग झिन झोउ हे चिनी मालवाहू जहाज शनिवारी संध्याकाळी न्हावा शेवाहून मुंद्रा बंदरासाठी निघाले होते तेव्हा शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री वर्सोवा किनाऱ्यावर धडकले. महाराष्ट्र कोस्टल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू जहाजाने वर्सोवा किनाऱ्याजवळ मालाडच्या माती कोळीवाड्याजवळ तिसाई या मासेमारी ट्रॉलरला मध्यरात्री धडक दिली.  मुंबई किनारपट्टीवर रविवारी पहाटे चिनी जहाजाला धडकून बुडालेला मासेमारी ट्रॉलर नंतर कोणतीही जीवितहानी न होता वाचवण्यात आला. हे जहाज मढ कोळीवाडा येथील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांचे होते.झू चेंग झिन झोउ हे चिनी मालवाहू जहाज शनिवारी संध्याकाळी न्हावा शेवाहून मुंद्रा बंदरासाठी निघाले होते तेव्हा शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री वर्सोवा किनाऱ्यावर धडकले.…

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून एका व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तामुळे आपल्या सर्वांच्या हृदयाला खोल जखम झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावून भारतात येणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही सामान्य कामगिरी नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही यशाची उंची कशी गाठायची हे डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन भावी पिढ्यांना शिकवत राहील,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. “डॉ. मनमोहन…

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  वर्सोवा येथे नुकत्याच उघडलेल्या रेस्टॉरंटच्या मालकांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, ज्यांच्यावर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कार्तिक शेट्टी आणि त्यांची पत्नी मंजुळा हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये खास असलेल्या बेंगळुरू स्थित फ्रँचायझी रेस्टॉरंट इडली गुरूचे मालक आहेत. मुंबई: वर्सोवा येथे नुकत्याच उघडलेल्या रेस्टॉरंटच्या मालकांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, ज्यांच्यावर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कार्तिक शेट्टी आणि त्यांची पत्नी मंजुळा हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये खास असलेल्या बेंगळुरू स्थित फ्रँचायझी रेस्टॉरंट इडली गुरूचे मालक आहेत.तक्रारदाराला वर्सोवा, अंधेरी येथे…

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला अंबोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   त्याच्याविरुद्ध पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना सोमवारी नऊ वर्षीय पीडितेच्या हाउसिंग सोसायटीत घडली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा यूपीचा रहिवासी असून त्याचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  प्रसिद्ध RJ आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सिमरन सिंगने राहत्या घरात आपला जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ४७ मध्ये एका फ्लॅटमध्ये सिमरन मैत्रिणीसोबत राहत होती. तिच्या मैत्रिणीनेच याची पोलिसांना माहिती दिली. रुममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. सिमरन रेडिओ जॉकी म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर म्हणून काम करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.

Read More

दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळत आहे. त्यांच्यापर्यंतही मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी पोहचली असून त्यांनी सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघ या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून दंडाला काळी फीत बांधून मैदानात उतरला होता.

Read More