दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ ) मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत आहे. दिनांक ६ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ह्या स्पर्धा होतील. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १७ संघांचा सहभाग आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.
Breaking
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू
- नागपूरवासीय दुबई सिटी कार्निव्हलचा आनंद घेत आहेत, विमान हे आकर्षणाचे केंद्र…
- नागपूरमध्ये स्कूटरच्या ट्रंकमध्ये एवढी रोकड सापडली की अधिकारी चक्रावून गेले, तपासादरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना पकडले.
- धारावी-माहीम जंक्शन येथे पहाटे झालेल्या अपघातात ट्रेलरसह 5 वाहनांचे नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झालेली नाही…
- ‘फक्त मराठी’ बोलल्यानं फळ विक्रेत्याशी बाचाबाची, मुंब्रामध्ये जमावाने तरुणाला माफी मागायला लावली; व्हायरल व्हिडिओवर मनसेची प्रतिक्रिया…
- देव तारी त्याला कोण मारी ! हरिनामाचा जप करताना वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका; अंत्यविधीची तयारी.. अन् मृतदेह घरी नेताना ॲम्बुलन्स स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली अन् आजोबा झाले जिवंत
- यंदा वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60% होते पाकिस्तानी!
- वर्सोवा किनाऱ्यावर चिनी जहाजाच्या धडकेने फिशिंग ट्रॉलर बुडाला; क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली…