दिनांक –०४/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवले. वृत्तसंस्थेने या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. घटनेच्या व्हिडिओमध्ये गोळी पवित्र मंदिराच्या भिंतीवर आदळताना दिसत आहे. एसएडी नेत्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलीस कोठडीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, गोळीबार करणाऱ्याची ओळख माजी दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतवादी नारायण चौरा अशी झाली आहे.