दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता ‘राज्य निवडणूक आयोगाची तयारी’ याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 18, मंगळवार दि. 19 आणि बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Share.