दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे.

लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल राणे आणि आर. के. कुळकर्णी तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.

Share.