दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो! यापुढे जोपर्यंत त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याची आणि त्याची लूट न होण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे
आज गुरुवारी (5 डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यानी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच यापुढे जोपर्यंत त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याची आणि त्याची लूट न होण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे असे संजय राऊत म्हणाले.