दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत व श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून राज्यपालांना दिली.

Share.