दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळत आहे. त्यांच्यापर्यंतही मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी पोहचली असून त्यांनी सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघ या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून दंडाला काळी फीत बांधून मैदानात उतरला होता.
Share.