दिनांक –०४/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  आजच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव माजी राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आणि त्यांना नवनिर्वाचित आमदारांचा एकमुखी पाठिंबा मिळाला.                                                            महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदावरील प्रदीर्घ सस्पेंस संपवत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील विधानभवनात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते.
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी फडणवीस यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी लवकरच महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणे अपेक्षित आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

Share.