दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- फेडएक्स कॉर्प.ने आपला वार्षिक इकॉनॉमिक इंपॅक्ट रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये २०२४ आर्थिक वर्षात स्थानिक समुदायांत समृद्धी आणण्यामध्ये कंपनीची भूमिका आणि कंपनीचे जगभरात पसरलेले नेटवर्क यांचे विश्लेषण केले आहे. व्यवसाय निर्णय डेटा आणि अॅनालिटिक्सचे अग्रणी प्रदाता डन अँड ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासात ‘फेडएक्स इफेक्ट’ अधोरेखित करण्यात आला आहे. भारतातील लक्षणीय योगदानासह जागतिक स्तरावर आर्थिक वृद्धी करणाऱ्या वस्तू आणि कल्पनांच्या प्रवाहाला गती देण्यावर फेडएक्सचा होणारा परिणाम यात दाखवला आहे.
फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमणियम म्हणाले, “आमच्या ग्राहकांची आणि त्यांच्या ग्राहकांची अधिक चांगली सेवा करण्यासाठी आणि त्यायोगे आमची पोहोच आणि आमचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रगत डेटा आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळ्यांसाठी पुरवठा शृंखला अधिक स्मार्ट करणे हे फेडएक्समध्ये आमचे व्हिजन आहे. ‘फेडएक्स इफेक्ट’ उत्कृष्टता, आर्थिक विकास आणि आम्ही जेथे राहतो आणि काम करतो त्या समुदायाप्रति असलेली आमची अढळ वचनबद्धत दर्शवितो.”
हा रिपोर्ट भारतातील लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यात आणि जागतिक व्यापार सुरळीत चालविण्यावर भर देण्यातील फेडएक्सची भूमिका अधोरेखित करतो. फेडएक्सने या भागात वाहतूक, स्टोरेज आणि कम्युनिकेशन क्षेत्रात निव्वळ इकॉनॉमिक आउटपुटमध्ये प्रत्यक्षपणे ०.१% योगदान दिले आहे. त्या व्यतिरिक्त, फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या प्रांताच्या एकंदर अर्थव्यवस्थेत अंदाजे २८० मिलियन यूएस डॉलरचे अप्रत्यक्ष योगदान दिले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या गुंतवणुकीत सामील आहे नवी दिल्ली कार्गो कॉम्प्लेक्स येथे गेटवे सुविधेचे आधुनिकीकरण, ज्यामुळे निर्यात क्षमता वाढल्या आणि भारतीय निर्यातदारांसाठी मधल्या प्रवासाचा समय कमी झाला आणि जागतिक मार्केटपर्यंत केवळ दोन ते तीन दिवसांत पोहोचणे त्यांना शक्य झाले.
फेडएक्सने फेडएक्स इम्पोर्ट टूल दाखल केले. हा एक केंद्रीकृत डिजिटल मंच आहे, जो दस्तऐवज व्यवस्थापन आणि कस्टम्स क्लियरन्स सुरळीत बनवतो त्यामुळे, भारतीय व्यवसाय अधिक कार्यक्षम आयात प्रक्रियांनी सक्षम होतात. मुंबई आणि आयआयटी मद्रास येथील सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये १० मिलियन यूएस डॉलर गुंतवून इनोव्हेशनच्या बाबतीतील आपली वचनबद्धता दाखवून दिली आहे आणि अशा प्रकारे, अधिक स्मार्ट, लवचिक पुरवठा शृंखलांच्या उभारणीसाठी भारताच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग केला आहे.