दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखत बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मोहमयी रूपाने कोणीही घायाळ होईल.
आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे.
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या फुलवंती सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे.
‘पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”…असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’च्या रूपामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 11 ऑक्टोबरला फुलवंती सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतात. मुळात पहिली झलक पाहूनच ‘फुलवंती’ची भव्यता कळतेय. रसिकप्रेक्षकांसाठी सांगीतिक नजराणा असलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरेल. ‘पद्मविभूषण दिवंगत बाबासाहेब पुरंदरे’ यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारीत आहे.

Share.