दिनांक –१७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते

Share.