दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावामध्ये पुष्पा 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वच सिनेमागृह हाऊसफुल झाला होता. पण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. थिएटर हाऊसफुल्ल झाल्याने तिकीट बुकिंग बंद करण्यात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. काहींनी केबिनवर दगडफेक ही केली. मात्र तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहचले आणि वातावरण शांत करण्यात आले.

Share.