दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  द बॉडी शॉप या एथिकल व शाश्‍वत सौंदर्यामधील जागतिक अग्रणी कंपनीने अद्वितीय भारत-प्रेरित कलेक्‍शन ‘द इंडिया एडिट’ लाँच केले आहे. ही अद्वितीय व उत्‍साहवर्धक श्रेणी भारत-प्रेरित घटकांच्‍या संपन्‍नतेला साजरे करते, ज्‍याद्वारे विशेषत: ‘ओन्‍ली इन इंडिया, फॉर यू’चा संदेश देते. द इंडिया एडिटमध्‍ये भारताचे सेलिब्रेशन म्‍हणून लोटस, हिबिस्‍कस, पॉमेग्रेनेट आणि ब्‍लॅक ग्रेप या चार विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या कलेक्‍शन्‍सचा समावेश आहे.

द बॉडी शॉपच्‍या एथिकल ब्‍युटीप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत हे कलेक्‍शन्‍स वेगन, पॅराबेन-मुक्‍त आणि डर्माटोलॉजिकली चाचणी केलेले आहेत, तसेच ९० टक्‍क्‍यांहून अधिक नैसर्गिक घटक व आयएफआरए-प्रमाणित फ्रॅग्रॅन्‍सेससह डिझाइन करण्‍यात आले आहेत ज्‍यामधून उत्‍साहवर्धक सुगंधाचा अनुभव मिळतो. हे कलेक्शन भारतातील द बॉडी शॉप रिटेल स्‍टोअर्समध्‍ये आणि दबॉडीशॉपडॉटइन या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

यामधून द बॉडी शॉपची भारतातील भारत-प्रेरित फ्लोरा अँड फोना घटकांच्‍या संपन्‍न वारसाप्रती कटिबद्धता दिसून येते. लोटसचे सेलिब्रेशन, वैविध्‍यपूर्ण हिबिस्‍कस, शुभ पॉमेग्रेनेट असो किंवा व्‍यापक ब्‍लॅक ग्रेप असो, हे घटक भारतीय परंपरेमध्‍ये खोलवर रूजलेली गाथा सांगतात. विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही श्रेणी भारतीय सौंदर्य परंपरांची वैविध्‍यता व विविधतेचे प्रतीक आहे, जी प्रत्‍येक उत्‍पादनामध्‍ये स्‍थानिक पैलूंची भर करते. हे

लोटस कलेक्‍शन: बॅलन्सिंग व हायड्रेटिंग बॉडी केअर

कमळाचे पैलू समाविष्‍ट असण्‍यासोबत सौंदर्य व मोहकतेचे कालातीत प्रतीक असलेले हे कलेक्‍शन त्‍वचेला कोमलता देते. सर्व प्रकारच्‍या त्‍वचांसाठी अनुकूल असलेल्‍या लोटस श्रेणीमध्‍ये २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी लोशन आणि १०० मिली बॉडी मिस्‍टचा समावेश आहे. हे सर्व घटक त्‍वचेला कोमलता देण्‍यासोबत त्‍वचेमधील ओलावा कायम ठेवण्‍यासाठी आणि त्‍वचा उत्‍साहवर्धक दिसण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. गुलाबाच्‍या सुगंधाने युक्‍त हे कलेक्‍शन शांतमय क्षणाचा आनंद घेणाऱ्यांसाठी परिपूर्ण आहे. किंमत: ३९५ रूपये (शॉवर जेल), ६९५ रूपये (बॉडी लोशन) आणि ७९५ रूपये (बॉडी मिस्‍ट).

हिबिस्‍कस कलेक्‍शन: रिव्‍हाइटलायझिंग व रिफ्रेशिंग बॉडी केअर

पारंपारिक जास्‍वंदाच्‍या फुलामधून प्रेरित हे कलेक्‍शन त्‍वचेला हायड्रेशन व ऊर्जा देत ताजेतवाने करते. या श्रेणीमध्‍ये २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी लोशन आणि १०० मिली बॉडी मिस्‍टचा समावेश आहे. हे प्रत्‍येक घटक फुलांच्‍या सुगंधासह रिफ्रेशिंग क्रॅनबेरी-सारखे अंडरटोन्‍स देतात. सर्व प्रकारच्‍या त्‍वचेसाठी अनुकूल हे कलेक्‍शन त्‍वचेला दिवसभर कोमल, तेजस्‍वी व आकर्षक ठेवते. किंमत: ३९५ रूपये (शॉवर जेल), ६९५ रूपये (बॉडी लोशन) आणि ७९५ रूपये (बॉडी मिस्‍ट).

पॉमेग्रेनेट कलेक्‍शन: एनर्जीझिंग व पोषक बॉडी केअर

सौंदर्य व मोहकतेचे प्रतीक असलेले पॉमेग्रेनेट कलेक्‍शन फ्रेश, फ्रूटी पिक-मी-अपसाठी आहे. पोषक डाळींबाचा अर्क असलेले बॉडी लोशन त्‍वचेला हायड्रेटेड ठेवते आणि त्‍वचेचे नैसर्गिक लुक अधिक आकर्षक करते, ज्‍यामधून त्‍वचेला कोमल, आरोग्‍यदायी चमक मिळते. या श्रेणीमध्‍ये २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी लोशन आणि १०० मिली बॉडी मिस्‍टचा समावेश आहे. या प्रत्‍येक घटकामध्‍ये फळांचा ताजेपणा सामावलेला आहे. सर्व प्रकारच्‍या त्‍वचेसाठी अनुकूल असलेल्‍या या कलेक्‍शनची किंमत: ३९५ रूपये (शॉवर जेल), ६९५ रूपये (बॉडी लोशन) आणि ७९५ रूपये (बॉडी मिस्‍ट).

ब्‍लॅक ग्रेप कलेक्‍शन: आकर्षक व सेन्‍सुअल बॉडी केअर 

संपन्‍न व वैविध्‍यपूर्ण ब्‍लॅक ग्रेप या कलेक्‍शनमध्‍ये फळांच्‍या सुगंधाची भर करते, जे त्‍वचेची काळजी घेण्‍यासाठी परिपूर्ण आहे. या श्रेणीमध्‍ये २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी लोशन आणि १०० मिली बॉडी मिस्‍टचा समावेश आहे, ज्‍यामधून ताजा, ज्‍यूसी फ्रॅग्रॅन्‍स मिळतो. बॉडी लोशन त्‍वचेला हायड्रेशन देते, ज्‍यामुळे त्‍वचा कोमल व मजस्‍वी बनते. शॉवर जेल आणि मिस्‍ट उत्‍साहवर्धक ताजेपणा देतात. सर्व प्रकारच्‍या त्‍वचेसाठी अनुकूल असलेल्‍या या कलेक्‍शनची किंमत: ३९५ रूपये (शॉवर जेल), ६९५ रूपये (बॉडी लोशन) आणि ७९५ रूपये (बॉडी मिस्‍ट).

Share.