दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित An Unpalatable Truth या इंग्रजी आणि त्याच्या `एक न पटणारे सत्य’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सकाळी १०.३० वाजता पुणे रेल्वे स्थानकाजवळील लेमन ट्री प्रिमियर येथे होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपथॅलमालॉजी संस्थेचे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर हे इंग्रजी तर सौ. अरुणा केळकर या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करतील. मराठी पुस्तकाचा अनुवाद मुंबईस्थित पत्रकार अशोक शिंदे यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन स्नेहल सिंग यांच्या माईंड स्पिरिट वर्क्स या संस्थेने केले आहे.

एक न पटणारे सत्य हे पुस्तक अंतराळविश्वातील भ्रमंती घडवून तिथल्या सर्व शक्यतांविषयीचे भाष्य करणारे आहे, उडकत्या तबकडत्या, समांतर विश्व, सेटी, मोआई पुतळे, रोसवेल, एरिया ५१ अशा अनेक विषयांवरील लिखाणातून विश्वाचे गूढ उलगडण्याच्या नव्या संशोधनाला चालना मिळावी, हा त्यामागचा हेतू आहे. डॉ. मेहरा श्रीखंडे यांनी यापूर्वी मृत्यूपश्चात जीवनाचा अध्ययनासाठी लिखाण केले आहे. वैद्यकीय अनुभवांच्या आधारे त्यांनी लिहिलेल्या `पॅरानॉर्मल एक्सपेरियन्सेस’ या पुस्तकाला लोकप्रियता मिळाली तसेच त्याची मराठी आवृत्तीदेखील प्रकाशित झाली. त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठ, इंग्लंड तसेच तत्कालिक राज्यपाल रमेश बैस आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्याकडूनही सन्मान प्राप्त झाले आहेत.

Share.