दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने सीएनजी वेईकल श्रेणीमध्ये मोठे प्रयत्न करणे सुरू ठेवले आहे, जेथे मार्केट लीडर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. प्रबळ उत्पादन पोर्टफोलिओ आणि धोरणात्मक उपक्रमांसह कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत एकूण सीएनजी श्रेणीमध्ये २१.१ टक्क्यांचा प्रभावी मार्केट शेअर संपादित केला. महाराष्ट्रात या कालावधीदरम्यान ब्रँडच्या एकूण कार विक्रीमध्ये ३४ टक्के सीएनजी वेईकल्स होत्या, ज्यामधून प्रबळ प्रादेशिक वाढ दिसून येते. टाटा मोटर्सची शाश्वत गतीशीलतेप्रती कटिबद्धता विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह लँडस्केपशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या सक्रिय दृष्टिकोनामधून दिसून येते.
टिएगो, टिगोर, नेक्सॉन, अल्ट्रोज आणि पंच असे लोकप्रिय मॉडेल्स सीएनजी विक्रीला गती देण्यामध्ये साह्यभूत ठरले आहेत, ज्यांचे आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक ब्रँड विक्रीमध्ये अनुक्रमे २२ टक्के, ४८ टक्के, ३० टक्के, ३२ टक्के अणि ३५ टक्के योगदान आहे. टाटा पंच प्रांतामध्ये ब्रँडची सर्वाधिक विक्री होणारी सीएनजी मॉडेल ठरली, ज्यानंतर नेक्सॉन, अल्ट्रोज, टिगोर आणि टिएगोचा क्रमांक आहे. या आकडेवारींमधून टाटा मोटर्सचे शाश्वत वेईकल श्रेणीमधील नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती समर्पितता दिसून येते.
आपल्या वाढत्या उत्पादन पोर्टफोलिओशी बांधील राहत भारतातील सीएनजी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हे विस्तारीकरण श्रेणीच्या प्रबळ सीएजीआर व वार्षिक वाढीचे प्रमुख स्रोत राहिले आहे.
टाटा मोटर्सच्या सीएनजी ऑफरिंग्ज बाबत:
नेक्सॉन आयसीएनजी: टाटा नेक्सॉनने स्टाइल, कार्यक्षमता आणि व्यावहारिकतेसह भारतातील ग्राहकांमध्ये आवडती वेईकल म्हणून आपली छाप निर्माण केली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये टाटा मोटर्सने भारतातील ट्विन-सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञान असलेली पहिली एसयूव्ही नेक्सॉन आयसीएनजीच्या लाँचसह श्रेणीला नव्या उंचीवर नेले. १०० पीएस शक्ती आणि १७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या १.२-लीटर टर्बोचार्ज्ड इंजिनची शक्ती असलेली नेक्सॉन आयसीएनजी कार्यक्षमता आणि इंधन क्षमतेमध्ये सानुकूल संतुलन देते. या वेईकलमधील नाविन्यपूर्ण ट्विन-सिलिंडर सेटअप एैसपैस जागा देण्यासोबत ३२१ लीटर बूट क्षमता देते, ज्यामुळे सीएनजी श्रेणीमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.
ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्साहित करत नेक्सॉन आयसीएनजीमध्ये प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत, जसे व्हेण्टिलेटेड लेदरेट सीट्स, १०.२५-इंच हार्मन इन्फोटेन्मेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि एअर प्युरिफायर. या लाँचसह टाटा मोटर्सने सीएनजी वेईकल्सना नव्या उंचीवर नेले आहे आणि कार्यक्षमता, नाविन्यता व स्टाइलचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी पसंतीचा पर्याय म्हणून नेक्सॉनचे स्थान अधिक दृढ केले आहे.
पंच आयसीएनजी: टाटा मोटर्सने पंचसह सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीला अग्रस्थानी नेले आणि त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये या वेईकलची सीएनजी व्हर्जन लाँच केली. या श्रेणीने वार्षिक ८३ टक्क्यांची अपवादात्मक वाढ केली, जेथे पंचने आर्थिक वर्ष २४ मध्ये ६८ टक्के मार्केट शेअर संपादित केला.
पंच अग्रगण्य वैशिष्ट्यांसह नवीन बेंचमार्क्स स्थापित करत आहे, जसे भारतातील पहिले ट्विन-सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञान, जे अद्वितीय बूट स्पेस आणि प्रत्यक्ष सीएनजी मोड स्टार्टची सोयीसुविधा देते. या वर्षातील पहिल्या सहामाहीत भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार पंचने ग्राहकांसाठी प्रीमियर निवड म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. या कारच्या ५-स्टार जीएनसीएपी रेटिंगमधून सुरक्षिततेमधील तिचे नेतृत्व दिसून येते. भर करण्यात आलेल्या सीएनजी व्हेरिएण्टने एकूण पंच ब्रँडसाठी ३० टक्के वाढीचे योगदान दिले आहे.
अल्ट्रोज आयसीएनजी: २.७ लाख आनंदी ग्राहकांसह अल्ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक श्रेणीमध्ये नवीन मानक स्थापित केले आहेत. ५-स्टार ग्लोबल एनसीएपी सेफ्टी रेटिंग मिळालेली पहिली भारतीय हॅचबॅक अल्ट्रोज ट्विन-सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञान आणि तडजोड न करता येणारे बूट स्पेससह नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी आहे. तसेच, ही कार पेट्रोल, डिझेल आणि आयसीएनजी असे विविध पॉवरट्रेन पर्याय देते.
वॉइस-असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, १०.२५-इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट आणि ३६०-डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये असलेल्या अल्ट्रोज आयसीएनजीने मे २०२३ मध्ये लाँच झाल्यापासून एकूण ब्रँड विक्रीमध्ये ११ टक्के वाढ केली आहे.
टिएगो आणि टिगोर आयसीएनजी: जानेवारी २०२२ मध्ये लाँच करण्यात आलेले टिएगो व टिगोर आयसीएनजी व्हेरिएण्ट्सनी टाटा मोटर्सच्या शाश्वतता प्रवासामध्ये मोठा टप्पा गाठला. ऑगस्ट २०२३ मध्ये ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञानासह अपग्रेड करण्यात आलेल्या या मॉडेल्समध्ये तडजोड न करता येणारे बूट स्पेस सादर करण्यात आले आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये एएमटी तंत्रज्ञान असलेल्या भारतातील पहिल्या सीएनजी वेईकल्स बनल्या.
डायरेक्ट सीएनजी मोड स्टार्ट, ७-इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एलईडी डीआरएल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये असलेले हे मॉडेल्स अपवादात्मक मूल्य देतात. या वेईकल्स तीन पॉवरट्रेन पर्याय: पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि आयसीएनजी असलेले त्यांच्या श्रेणीमधील एकमेव ऑफरिंग्ज देखील आहेत.
टाटा मोटर्स अत्याधुनिक, शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स देत ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहे. ट्विन-सिलिंडर सीएनजी सेटअप सारख्या तंत्रज्ञानांसह सतत नाविन्यता आणत आणि आपल्या प्रबळ उत्पादन लाइन-अपचा विस्तार करत कंपनीचा भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक प्राधान्यक्रमांची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्सचा शुद्ध, हरित भविष्याचा दृष्टिकोन आहे आणि ग्राहकांना कार्यक्षमता, सुरक्षितता व पर्यावरणीय जबाबदारीचे संतुलन राखणाऱ्या उत्पादनांसह सक्षम करण्याप्रती समर्पित आहे. कंपनी सीएनजी श्रेणीमध्ये बेंचमार्क्स स्थापित करेल, तसेच भारताच्या शाश्वत परिवहनाप्रती प्रवासाला गती देईल.