दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ग्राम शिक्षण सेवा मंडळ धोलवड या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्रशेठ सोपानबुवा नलावडे यांना वै. ह. भ. प. कोंडाजीबाबा डेरे वारकरी पुरस्कार हा श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, पिंपळगांव सिद्धनाथ, (ता. जुन्नर) येथे ह. भ. प. गुरुवर्य जेष्ठ किर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन  अशोकदादा घोलप, जनसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. कृष्णा खंडागळे, तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, नवी मुंबई फळ बाजार येथील अनेक फळव्यापारी हजर होते.

धोलवड गावातील अनेक ग्रामस्थ, पिंपळगांव सिद्धनाथ, विठ्ठलवाडी ग्रामस्थ, परीसरातील बंधू भगिनी बहुसंख्येने ऊपस्थित होते. आळंदी येथील सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्थ व खजिनदार पदी काम करत असताना संस्थेला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा तसेच इतर अनेक संस्थांमध्ये सामाजिक , शैक्षणिक, वारकरी व मुंबई मराठा देशस्थ ज्ञाती समाज, नवी मुंबई महापालिका परिवहन समिती माजी सभापतीपद, आळंदी येथील समाजकार्याची दखल घेऊन उपरोक्त पुरस्कारा साठी आपली निवड करण्यात आली.

Share.