दिनांक –२५/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय रायगड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना डिपीडीसी अंतर्गत Innovative Fund मधून माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार ठिकाणी महिला बचत गटातील महिलांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणून प्रत्येक गारमेंट युनिट करिता आवश्यक असलेल्या शिलाई मशीन्स 7, काज-1, 1 बटण-1 ओव्हार्लोक मशीन-1 कटिंग मशीन 1 व इस्री-1, खरेदी करण्यात आल्या आहेत.

या मशीन्सवर गारमेंटच्या अनुषंगाने गाऊन, पेटीकोट, लेगीज व टॉप, टी शर्ट, कापडी बॅग, मुस्लीम समाजासाठी लागणारे बुरका व शालेय गणवेश इत्यादी कामाचे सुपरव्हिजन करणे व महिलांना प्रशिक्षण देण्याकरीता माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या चार ठिकाणी गारमेंट युनिट करिता 1 अनुभवी व प्रशिक्षित सुपरव्हायजर नियुक्त करावाचे आहेत. याकरिता प्रशिक्षित सुपरव्हायजर चे वय 21 ते 45 असणे आवश्यक आहे. तसेच टेलरिंग प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व शिक्षण किमान 10 वी पास असावे. तरी इच्छूकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण यांनी केले आहे.

Share.