दिनांक – ०४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालूक्यातील एका पती-पत्नीने गळफास घेऊन एकत्रच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेहाची शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत.

आठ दिवसांपूर्वी पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या 21 वर्षीय मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तसेच दोन वर्षांपूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलाने देखील राहत्या घरात आत्महत्या केली होती या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केलाय.

या दोन्ही पती-पत्नीच्या जवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या सापडल्या. त्यांच्या मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता त्यात वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर असल्याचं समजलं. गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेत कार्यरत होते ते सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share.