दिनांक – ०४/०२/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-पुणे जिल्ह्यात असलेल्या आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. आळंदी परिसरातील वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषणसंदर्भात महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी करत आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासाचा आढावा रूपाली चाकणकर यांनी घेतला.

Share.