दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  23 तारखेला विधानसभेचा निकाल लागला त्या निकालात महायुतीचा दणदणीत विजय झाला. आज गुरुवारी (5 डिसेंबर) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा पदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरले आहेत. अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. पण जलसंपदामंत्री असताना अजित पवार यांच्यावर सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. काँग्रेसची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.
Share.