दिनांक –३०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- झू चेंग झिन झोउ हे चिनी मालवाहू जहाज शनिवारी संध्याकाळी न्हावा शेवाहून मुंद्रा बंदरासाठी निघाले होते तेव्हा शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री वर्सोवा किनाऱ्यावर धडकले. महाराष्ट्र कोस्टल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू जहाजाने वर्सोवा किनाऱ्याजवळ मालाडच्या माती कोळीवाड्याजवळ तिसाई या मासेमारी ट्रॉलरला मध्यरात्री धडक दिली. मुंबई किनारपट्टीवर रविवारी पहाटे चिनी जहाजाला धडकून बुडालेला मासेमारी ट्रॉलर नंतर कोणतीही जीवितहानी न होता वाचवण्यात आला. हे जहाज मढ कोळीवाडा येथील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांचे होते.झू चेंग झिन झोउ हे चिनी मालवाहू जहाज शनिवारी संध्याकाळी न्हावा शेवाहून मुंद्रा बंदरासाठी निघाले होते तेव्हा शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री वर्सोवा किनाऱ्यावर धडकले.…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून एका व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तामुळे आपल्या सर्वांच्या हृदयाला खोल जखम झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावून भारतात येणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही सामान्य कामगिरी नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही यशाची उंची कशी गाठायची हे डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन भावी पिढ्यांना शिकवत राहील,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. “डॉ. मनमोहन…
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्सोवा येथे नुकत्याच उघडलेल्या रेस्टॉरंटच्या मालकांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, ज्यांच्यावर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कार्तिक शेट्टी आणि त्यांची पत्नी मंजुळा हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये खास असलेल्या बेंगळुरू स्थित फ्रँचायझी रेस्टॉरंट इडली गुरूचे मालक आहेत. मुंबई: वर्सोवा येथे नुकत्याच उघडलेल्या रेस्टॉरंटच्या मालकांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, ज्यांच्यावर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कार्तिक शेट्टी आणि त्यांची पत्नी मंजुळा हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये खास असलेल्या बेंगळुरू स्थित फ्रँचायझी रेस्टॉरंट इडली गुरूचे मालक आहेत.तक्रारदाराला वर्सोवा, अंधेरी येथे…
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला अंबोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना सोमवारी नऊ वर्षीय पीडितेच्या हाउसिंग सोसायटीत घडली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा यूपीचा रहिवासी असून त्याचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- प्रसिद्ध RJ आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सिमरन सिंगने राहत्या घरात आपला जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ४७ मध्ये एका फ्लॅटमध्ये सिमरन मैत्रिणीसोबत राहत होती. तिच्या मैत्रिणीनेच याची पोलिसांना माहिती दिली. रुममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. सिमरन रेडिओ जॉकी म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर म्हणून काम करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रात्री वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळत आहे. त्यांच्यापर्यंतही मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी पोहचली असून त्यांनी सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघ या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून दंडाला काळी फीत बांधून मैदानात उतरला होता.
दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे काल रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाल्याची दुःखदायक घटना घडली असून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री ८:०६ वाजता दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. रात्री ९:५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्नाटकमधील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रद्द करण्यात आली आहे. याशिवाय २७ डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिनांक – २६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ज्या भूमीत पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने १९७१ मध्ये हुसकावून लावले होते. त्याच भूमीत आता पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, यामुळे भारतासमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकतात. बांगलादेश लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक फेब्रुवारी २०२५ मध्ये तेथे पोहोचणार आहे.
दिनांक – २१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यंदा मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती. अनेकांचा पत्ता कट झाला आणि नाराजीनाट्य देखील रंगताना दिसल. नागपुरात शपथविधी कार्यक्रमानंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केल्याने महायुतीचे तिन्ही नेते कोंडीत सापडल्याचं चित्र दिसलं. अशात, मागील 4-5 दिवसापासून खातेवाटप रखडल्याने नेमकं खातेवाटप कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मंत्री न झालेल्यांची नाराजी आणि अपेक्षित विभाग न मिळाल्याने नाराजी, अशी दुहेरी अडचण एकाच वेळी येण्याऐवजी वादळ शांत करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांचा दिसतोय. सोबतच, काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी जोरदार मागणी करताना दिसत आहे, त्यामुळे…
