दिनांक – ०३/०९/२०२४, पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा-भडगाव नगरपालिका हद्दीत रस्त्याचे,गटारीचे, फुटपाटचे तसेच कुठलीही सार्वजनिक कामे टेंडर होऊन हि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रखडले असतील तर सदर कामाचे फोटो व थोडक्यात माहिती गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या खालील दिलेल्या ई-मेल आयडी वरती किंवा व्हाट्सअप क्रमांका वरती पाठवा तात्काळ त्या बातमीची दखल घेऊन ती बातमी प्रसिद्ध केली जाईल. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार,संबंधित इंजिनियर (शाखा अभियंता) यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल व सर्वसामान्य जनतेचे कामे मार्गी लागतील. लोकशाहीचा चौथा स्तंभ गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल. खालील दिलेल्या ईमेल आयडी वर संबंधित फोटो व थोड्क्यात फोटो पाठवा. ई-मेल आयडी -…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. तथापि, नांदेड तालुक्यात दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल ओलांडण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे. उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते.…
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- २ महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती…
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग…
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही. सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, वारणा समूहामध्ये साखर कारखाना, दुग्ध उत्पादन, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था, सहकारी बँक, महिलांची बँक, शेती प्रशिक्षण संस्था, सहकारी बँक, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बाजार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे.…
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे संचालक निपुण कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालक शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित…
दिनांक – ०३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री…
दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबईच्या लालबाग परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लालबाग परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर ८ जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सव्वा आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बेस्ट बस क्रमांक ६६ नंबरची बस लालबागवरून जात असताना हा अपघात झाला. ही बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. यावेळी ही बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली असता एका मद्यधुंद प्रवाशाने काही क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला. हा प्रवासी थेट…
दिनांक – ०२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आजचा दिवस इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते. नागला बंदर येथे सर्वात…
श्रीगणेशोत्सवातील थर्मोकोलसारख्या सजावटींना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सजावटींचा अवलंब करण्याच्या `उत्सवी’ संस्थेचे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांच्या २३ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत असून यंदा त्यांच्या सजावटीना महाराष्ट्र मंडळ, लंडनसह देश-विदेशातील अनेक संस्थांकडून श्री गणेशोत्सवासाठी मागणी होत आहे. `अय़ोध्या राममंदिर’ या संकल्पनेवरील ही सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून यंदा हे राममंदिर लंडनपर्यंत पोहचले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थांकडून त्यासाठी आग्रह केला जात आहे. नानासाहेब शेंडकर यांनी पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी २००१ साली ही चळवळ सुरु केली. त्यासाठी थर्माकोल निर्मिती आणि सजावटीचा त्यांचा सुमारे १०० कामगार कार्यरत असलेला सुस्थितीतील कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुठ्ठ्यांपासून…
