Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८४ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १६ ऑक्टोबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १६ ऑक्टोबर, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही. सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार,…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्‍या २४व्‍या अॅन्‍युअल जनरल मीटिंग (एजीएम)मध्‍ये अनुपालन-केंद्रित दृष्टिकोनासह लाभक्षमतेप्रती कटिबद्धतेची पुष्‍टी दिली, जेथे कंपनीने आपल्‍या मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. “मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायाप्रती कटिबद्धतेसह आमचा लवकरच पीएटी लाभक्षमता वि‍तरित करण्‍याचा मनसुबा आहे,” असे शर्मा म्‍हणाले. एजीएममध्‍ये पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर शर्मा यांनी क्‍यूआर कोड व साऊंडबॉक्‍स यांसारख्‍या कंपनीच्‍या अग्रगण्‍य नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्‍ये पेटीएमच्‍या मोठ्या भूमिकेला दाखवले. ते म्‍हणाले, “आम्‍ही भारतातील व्‍यवसाय आणि लघु व्‍यापाऱ्यांसाठी नेहमी जागतिक…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- उदरनिर्वासाठी गावभर गेलेल्या ग्रामस्थांकरीता दूरदृष्टी प्रणाली द्वारे ग्रामसभा घेण्याबाबत ग्राम विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व प्रधान सचिव एकनाथ डवले यांना रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी लेखी निवेदन ई-मेल द्वारे पत्र पाठवून जोरदार मागणी केली आहे. यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात एकूण 28813 ग्रामपंचायती आहेत. उक्त जिल्ह्यातील विविध गावांतील ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना अनेकदा रोजगार किंवा उदरनिर्वाहाच्या आवश्यकतेमुळे आपल्या गावांपासून दूर 500 कि.मी. अंतरापेक्षा अधिक अन्य ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना गावात नियमितरित्या होणाऱ्या ग्रामसभांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे कठीण असते. यामुळे गावाच्या विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय…

Read More

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ईद ए मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली. बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहल, आदिवासी विकास…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (“बीएलएस”)ने १५ हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलद-गती गुंतवणूक कार्यक्रमामध्ये विशेषीकृत सेवा पुरविणारी दुबई-स्थित सल्लागार संस्था सिटीझनशिप इन्व्हेस्ट (सीआय)चे १०० टक्‍के भागभांडवल संपादित करण्यासाठी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्याची घोषणा आज केली. या १०० टक्‍के भागभांडवलाच्या संपादनाचे मूल्य ३१.० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (~रु. २६० कोटी) आहे व या व्यवहाराला अंतर्गत जमेतून निधीपुरवठा करण्यात येणार आहे. सर्व आवश्यक मान्यता प्राप्त झाल्यावर हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डिरेक्टर श्री.…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदश्य संवादप्रणाली व्दारे उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने वसीम अहमद खान यांचा गायन कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्यावर अभय दातार तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. हा कार्यक्रम रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिक माहितीसाठी संपर्क २४३०४१५०. वसीम अहमद खान यांची हेवा करणारी वंशावळ आहे. १३ व्या शतकापासून भारतात गायन क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या आग्रा घराण्याचे ते एकमेव थेट वंशज आहेत त्यांच्या…

Read More

दिनांक –१६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत व श्री गणेशाची मूर्ती भेट म्हणून राज्यपालांना दिली.

Read More