दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश संघटक-सचिव,ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली विनंती.तसेच पक्षाचे मुख्य सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे लेखी पत्र दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटक-सचिव,ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश कार्यालय येथे जयंत पाटील यांची भेट घेतली व यावेळी यांना जळगाव जिल्ह्याच्या पक्ष संघटनात्मक बाबत व आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला रोखायची असेल तर ते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) हे योग्य रीतीने जिल्ह्यात महायुतीला आळा घालू शकतात.जिल्ह्यातील पक्षाचे इतर नेते फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरता विचार करतात असे निवेदन दिले.सदर निवेदनात असे म्हटले आहे की विद्यमान आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) आणि जळगांव जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी यांना जळगाव जिल्हा पातळीवरच्या पक्षाच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांना निमंत्रित करावे तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे.की जळगाव जिल्ह्यातून शरदचंद्र पवार गटाचे तुतारीचे आमदार जास्तीत-जास्त निवडून आणायचे असेल तर विद्यमान आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्याशिवाय पर्याय नाही.कारण जिल्ह्यात एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.दिनांक१४/०९/२०२४ रोजी यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा मध्ये या सक्रिय काम करण्याची घोषणा केली आहे .

तसेच लोकसभेला पक्षाचे नेते असणाऱ्या मतदारसंघात महाविकास आघाडी मतांची टक्केवारी मायनस मध्ये आहे.आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यातून जास्तीत-जास्त आमदार निवडून आणण्यासाठी एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) पक्षात असणे ही काळाची गरज आहे.
एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांची राजकीय अडचण पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.असे महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे.

Share.