Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- निर्माता सलीम अख्तर यांच्या दृष्टीकोनातून आणि दिग्दर्शक जुली जैस्मिन यांच्या कौशल्याखाली सिनेमाचा `डाल रोटी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सर्किटमध्ये एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून उदयास आला आहे. हा चित्रपट ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्रण दिसून येते. त्याच्या सशक्त कथाकथनामुळे आणि सांस्कृतिक प्रासंगिकतेसाठी प्रेक्षकांवर तो खोलवर परिणाम साधत आहे. प्रतिभावान दिग्दर्शिका ज्युली जस्मिन यांनी `दाल रोटी’ने त्याच्या मार्मिक कथनासाठी, विशेषतः भारतातील शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षांच्या चित्रणासाठी दाद मिळवली आहे. या चित्रपटाने अलीकडेच प्रतिष्ठित 16 व्या जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (JIFF) विशेष ज्युरी पुरस्कार मिळवला, जो ज्युली जस्मिनच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा उत्तम नमुना आहे. JIFF मधील यशाव्यतिरिक्त, दाल रोटीची आगामी…

Read More

दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- द बॉडी शॉप या मूळच्या ब्रिटिश आंतरराष्ट्रीय एथिकल ब्यूटी ब्रॅण्डने आपली लोकप्रिय व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणी सर्वांपुढे आणण्यासाठी भारतीय मॉडेल व अभिनेत्री डायना पेंटी हिच्याशी सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एका सुलभ पण प्रभावी दिनक्रमावर प्रकाश टाकला जाणार आहे. या दिनक्रमामुळे त्वचेवर नैसर्गिक, तेजस्वी चमक येते. सणासुदीच्या काळात त्वचेला झळाळी आणण्यासाठी हा दिनक्रम उत्तम आहे. व्हिटॅमिन सी स्किनकेअर श्रेणीमध्ये डेली ग्लो क्लींजिंग पॉलिश, ग्लो रीव्हिलिंग सीरम, ग्लो बूस्टिंग इंटेन्स मॉश्चुरायजर आदी उप्तादनांचा समावेश आहे.द बॉडी शॉपने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये डायना तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या व्यक्तिगत दिनक्रमाबद्दल (स्किनकेअर रुटीन) सांगते. तिच्या रुटीनमध्ये द…

Read More

दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदेने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून अनिल महाजन यांचा एरंडोल पारोळा मतदार संघात दौरा. विकासापासून दुर्लक्षित झालेला मतदारसंघ एरंडोल-पारोळा या मतदारसंघात नव्याने विकास कामे करण्यासाठी आगामी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवार अनिलभाऊ महाजन यांचा परिचय दौरा सुरू होत आहे. प्रत्येक गावात जाऊन सर्व नागरिकांशी ओळख परिचय करणार आहेत. तसेच यावेळी दोन्ही तालुक्यांमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी वाटचाली बाबत ते आपले भूमिका जाहीर करणार आहेत. नवतरुण युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करणार आहेत. या परिचय संवाद दौऱ्यादरम्यान सर्वांच्या भेटी घेणे काही नवीन लोकांशी ओळख परिचय करणे. एरंडोल-पारोळा…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. वेळ ही अमूल्य बाब असून आयुष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक भिमराया मेत्री, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यावेळी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल व यंत्रनिगराणी कार्यशाळा व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेमधील निर्लेखित झालेले निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक जी.एस.टीधारक भंगार खरेदीदारांनी विहित नमुन्यातील नमुना अर्ज ङिडी.सह दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक संस्था, पनवेल एन.के.चौधरी यांनी केले आहे. सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सदरचे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस.…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य प्रा. सुनील शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य व कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून लेखक, समीक्षक, संपादक, व्याख्याते, समाजशास्त्र व इतिहास विषयाचे तज्ञ शिक्षक, अशी त्यांची ओळख आहे. उपक्रमशील प्राध्यापक ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यासमिती सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ चेअरमन, विषयतज्ञ मार्गदर्शक, पेपर…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमीपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार व कोळी महासंघाचे…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाची (CPA India Region) 10 वी परिषद दिनांक 23 व 24 सप्टेंबर, 2024 रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सचिव-1 (कार्यभार) जितेंद्र भोळे तसेच सचिव-2 (कार्यभार) डॉ. विलास आठवले हे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये “शाश्वत आणि समावेशी विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर विचारमंथन होणार आहे. चर्चासत्रात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ विधानपरिषद…

Read More

दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 22) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या. राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू बिसेन व कार्यकारी संचालक निता मोरे आदि उपस्थित होते.

Read More