Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हिंदुस्थानाबद्दल जाज्वल्य राष्ट्रप्रेम असलेल्या पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय हिंदुमहासभा यांच्या वतीने दादर येथील पाटील मारूती मंदिर सभागृह येथे आज सायंकाळी सहा वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदुमहासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांचे `अहिंसा एक भ्रम’ या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन भाषण आणि विवेचन होणार आहे. महाराष्ट्राचे प्रमुख कार्यवाह महेश पटेल आणि मुंबईचे अध्यक्ष अनुप केणी देखील यावेळी उपस्थित राहतील. अधिकाधिक देशभक्तांनी यावेळी उपस्थित राहून अमरवीर पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन हिंदुमहासभेच्या वतीने…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव  जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अवर सचिव सुरेश मोगल, ज्येष्ठ पत्रकार  मधुकर भावे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत हाप्पे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात ‘स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने, सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत, अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावत, नागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते. विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले.…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  भायखळा, मदनपुरा येथील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करून येथील कुटुंबांना सुरक्षित घरे देण्याचा माझा प्रयत्न असून यासाठी सुधारीत गृहनिर्माण धोरणाचा अभ्यास मी करत आहे. या सुधारीत गृहनिमारण धोरणानुसार येथील जुन्या चाळींचा पुनर्विकास करता येणे शक्य आहे. एवढेच नाही भायखळा विधानसभा ड्रग विळख्यात आहे. हा परिसर ड्रग मुक्त करून या व्यसनाच आहारी गेलेल्या तरुणांसाठी रिहॅबसेंटर बनवण्याचा माझा विचार आहे. जे जे रुग्णालय लॅबच्या एका रिकाम्या जागेत या अमली पदार्थांचय आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन सेंटर बनवून त्यांला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणारे हे पुनर्वसन सेंटर असेल अशाप्रकारचा प्रयत्न माझा असेल,असे भायखळा विधानसभेच्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळूर आजही रोजगार संधी आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३% वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे. या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे. बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२  व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये गुरुवार, दि.१४ व शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील  दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश पाटील  यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदारसंघात गुरुवार, दि.१४ नोव्हेंबर रोजी गृहमतदानाकरिता २८ पथके कार्यरत असणार असून  शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी २८…

Read More

नवी दिल्ली : एखाद्या गुन्ह्यातील आरोपी वा दोषीला शिक्षा म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवणे असंवैधानिक आहे. अशाप्रकारे बुलडोझर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. आरोपींनाही संविधानाने काही हक्क दिले आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांना अधिकारांचा दुरुपयोग करून कुणाचे हक्क हिसकावता येणार नाही, असे खंडपीठाने निकालपत्रात म्हटले आहे. हे निकालपत्र वाचून दाखवताना न्यायमूर्ती गवई यांनी कवी प्रदीप यांची एक कवितादेखील ऐकवून दाखवली. ‘घर सपना है, जो कभी न टूटे’ असे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने बुलडोझर कारवाईबाबत गाईडलाईन्स जारी करणार असल्याचे…

Read More

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला नुकतीच राज्य मान्यता दिली आहे. या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार…

Read More

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम…

Read More

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन…

Read More