दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इकोफाय या एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ असण्यासोबत भारतीय रिटेल क्षेत्रातील क्लायमेट फायनान्स पोकळी दूर करण्याप्रती समर्पित असलेल्या भारतातील ग्रीन-ओन्ली एनबीएफसीने दुचाकी व तीनचाकी विभागांमध्ये कार्यरत आघाडीची जागतिक ऑटोमेकर टीव्हीएस मोटर कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक ३डब्ल्यू (तीनचाकी) क्षेत्रात या धोरणात्मक सहयोगाचा इलेक्ट्रिक तीन-चाकी अवलंबतेला गती देण्याचा आणि देशभरात शाश्वत गतीशीलतेला चालना देण्याचा मनसुबा आहे. इकोफायच्या सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्हणाल्या, ”टीव्हीएस मोटर कंपनीसोबतचा हा सहयोग भविष्यात शुद्ध ऊर्जा संपादित करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेशी परिपूर्णपणे संलग्न आहे आणि आम्हाला पॅसेंजर व कार्गो इलेक्ट्रिक तीनचाकींसाठी सर्वसमावेशक फायनान्सिंग…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –१०/१०/२०२४ , गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (गणेश पुजारी):- बांबवडे (ता. शिराळा) जिल्हा सांगली येथील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी यांना कळविण्यात आनंद होतो की, आपणा सर्वांच्या सहकार्याने साकार झालेल्या श्री सुयोग गणेश मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा रविवारी दि १३/१०/२०२४ रोजी या शुभ मुहुर्तावर संपन्न होणार आहे. श्री जय सद्गुरु ष.ब्र.प्र १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या सुवर्ण हस्ते होमहवन व मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा पूर्व विधी, कलशारोहन संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहुन श्रींचे आशिर्वाद घ्यादे, ही नम्र विनंती. असे आवाहन श्री सुयोग गणेश मंदिर समिती, बांबवडे च्या वतीने करण्यात आले आपले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा…
मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत भेटीवर आलेल्या अध्यक्ष डॉ मोहमद मुइझ्झु यांचे सन्मानार्थ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टो) राजभवन मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते. मालदीव राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्न व पूरक उत्पादने खरेदीबाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. सणासुदीच्या दिवसांत गोडधोड खाद्यपदार्थंची रेलचेल असते. या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ व उत्पादने उपलब्ध व्हावीत, नागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर वेळीच विशेष खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येणारी देखरेख, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- डॉ. मेहरा श्रीखंडे लिखित An Unpalatable Truth या इंग्रजी आणि त्याच्या `एक न पटणारे सत्य’ या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सकाळी १०.३० वाजता पुणे रेल्वे स्थानकाजवळील लेमन ट्री प्रिमियर येथे होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपथॅलमालॉजी संस्थेचे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर हे इंग्रजी तर सौ. अरुणा केळकर या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करतील. मराठी पुस्तकाचा अनुवाद मुंबईस्थित पत्रकार अशोक शिंदे यांनी केला आहे. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन स्नेहल सिंग यांच्या माईंड स्पिरिट वर्क्स या संस्थेने केले आहे. एक न पटणारे सत्य हे पुस्तक अंतराळविश्वातील भ्रमंती घडवून तिथल्या सर्व…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशभरात सायबर फसवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जानेवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान भारतीयांचे १७५० कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे इंडियन सायबरक्राइम कोऑर्डिनेशनच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. या स्थितीचे गांभीर्य नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टलच्या माध्यमातून अधिक प्रकर्षाने दिसून येते जेथे सायबर फसवणुकीच्या ७४०,००० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही फसवणूक रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांची गरज असल्याचे क्विक हीलचे सहसंस्थापक संजय काटकर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी क्विक हीलतर्फे भारतातील पहिले फसवणूक प्रतिबंध समाधान ‘अँटीफ्रॉडडॉटएआय’ लॉन्च करण्यात आले आहे. हे ‘मेड इन इंडिया’ समाधान तंत्रज्ञान जाणकारांसह सर्वसामान्यांवर परिणाम करणा-या आर्थिक फसवणूकांच्या…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावाचे ३३ वर्षिय फौजी जवान शेतात वडीलांना मदतीसाठी गेले असतांना शेतातुन परतीचा प्रवास करतांना विजांचा कडकडाट होवुन विज पडल्याने जागेवरच जवानाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली. शहरातील नवीन कॉलेज मागील परिसरातील रहिवासी असलेले तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथील सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे (वय-३३) हे नवीन घराची वास्तुशांती करण्यासाठी रजा घेऊन घरी आले होते. दि. ९ रोजी दिवसभर परीवारासह पेडकाई माता या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपल्या गावी आले असते अचानक सायंकाळी पावसाची रीमझीम सुरू झाली तेव्हा हातातील मनगटी घड्याळ आणि मोबाईल विजे पासुन सुरक्षेच्या दृष्टीने घरी ठेवून आपल्या…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यात रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मासिक विद्यावेतनाचा पहिला हफ्ता आज अदा करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरूपात आज मंत्रालयात सहा प्रशिक्षणार्थींना मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते विद्यावतेन अदा करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदिप डांगे, उपायुक्त डी. डी. पवार, अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापुर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमीपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात श्री. गावित बोलत होते. शहरातील पटेलवाडी स्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहाच्या प्राणंगणातून आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते राज्यातील २ हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या १२० इमारतींचे दृरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरात भुमीपुजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा…
दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या…