Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार…

Read More

दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  फेडएक्स कॉर्प.ने आपला वार्षिक इकॉनॉमिक इंपॅक्ट रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये २०२४ आर्थिक वर्षात स्थानिक समुदायांत समृद्धी आणण्यामध्ये कंपनीची भूमिका आणि कंपनीचे जगभरात पसरलेले नेटवर्क यांचे विश्लेषण केले आहे. व्यवसाय निर्णय डेटा आणि अॅनालिटिक्सचे अग्रणी प्रदाता डन अँड ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेल्या या अभ्यासात ‘फेडएक्स इफेक्ट’ अधोरेखित करण्यात आला आहे. भारतातील लक्षणीय योगदानासह जागतिक स्तरावर आर्थिक वृद्धी करणाऱ्या वस्तू आणि कल्पनांच्या प्रवाहाला गती देण्यावर फेडएक्सचा होणारा परिणाम यात दाखवला आहे. फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमणियम म्हणाले, “आमच्या ग्राहकांची आणि त्यांच्या ग्राहकांची अधिक चांगली सेवा करण्यासाठी आणि त्यायोगे आमची पोहोच आणि…

Read More

दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सर्व शासकीय विभागांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह  विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त राजेश देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीतील…

Read More

दिनांक –१६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  जिल्ह्यातील सात मतदार संघाच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या  प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी बुधवार, दि.20 नोव्हेंबर  2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.  जिल्ह्यातील सात मतदार संघात बुधवार, दि.20 नोव्हेंबर  2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी  सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-   विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र ‘१२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे’, असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हिंदुस्थानाबद्दल जाज्वल्य राष्ट्रप्रेम असलेल्या पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय हिंदुमहासभा यांच्या वतीने दादर येथील पाटील मारूती मंदिर सभागृह येथे आज सायंकाळी सहा वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हिंदुमहासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांचे `अहिंसा एक भ्रम’ या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन भाषण आणि विवेचन होणार आहे. महाराष्ट्राचे प्रमुख कार्यवाह महेश पटेल आणि मुंबईचे अध्यक्ष अनुप केणी देखील यावेळी उपस्थित राहतील. अधिकाधिक देशभक्तांनी यावेळी उपस्थित राहून अमरवीर पंडित नथुराम गोडसे आणि हुतात्मा नारायण आपटे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन हिंदुमहासभेच्या वतीने…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव  जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अवर सचिव सुरेश मोगल, ज्येष्ठ पत्रकार  मधुकर भावे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत हाप्पे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. या महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात ‘स्वीप’ समन्वय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी पल्लवी तभाने, सहायक निवडणूक अधिकारी स्मिता सावंत, अपने आप स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक अभिलाषा रावत, नागपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बारवकर आणि प्रसिध्दीमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात उपस्थित होते. विजयकुमार सूर्यवंशी यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले.…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  भायखळा, मदनपुरा येथील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करून येथील कुटुंबांना सुरक्षित घरे देण्याचा माझा प्रयत्न असून यासाठी सुधारीत गृहनिर्माण धोरणाचा अभ्यास मी करत आहे. या सुधारीत गृहनिमारण धोरणानुसार येथील जुन्या चाळींचा पुनर्विकास करता येणे शक्य आहे. एवढेच नाही भायखळा विधानसभा ड्रग विळख्यात आहे. हा परिसर ड्रग मुक्त करून या व्यसनाच आहारी गेलेल्या तरुणांसाठी रिहॅबसेंटर बनवण्याचा माझा विचार आहे. जे जे रुग्णालय लॅबच्या एका रिकाम्या जागेत या अमली पदार्थांचय आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन सेंटर बनवून त्यांला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणारे हे पुनर्वसन सेंटर असेल अशाप्रकारचा प्रयत्न माझा असेल,असे भायखळा विधानसभेच्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नोकऱ्यांच्या बाबतीत बंगळूर आजही रोजगार संधी आणि वेतन वाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३% वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली आहे. या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे. बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे…

Read More